कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या चरणी गेल्या दोन महिन्यांत एक कोटी ८४ लाख चार हजार ७० रुपयांचे दान भाविकांनी अर्पण केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून दर महिन्याला किंवा दोन महिन्यांतून एकदा दानपेट्या उघडल्या जातात. गेल्या चार दिवसांपासून देवीच्या दानपेटीच्या मोजदादीचे काम सुरू होते, ते आज पूर्ण झाले.
बुधवार (ता. १८) पासून दानपेटीची मोजदाद सुरू झाली. पहिल्या दिवशी पेटी क्र. एकमधून ४८ लाख ८१ हजार ५५५ रुपये संकलित झाले. गुरुवारी (ता. १९) दानपेटी क्र. दोनमधून ७६ लाख ७९ हजार ३० रुपयांची मोजदाद झाली. शुक्रवारी (ता. २०) पाच दानपेट्यांची मोजदाद झाली. पेटी क्र. चारमधून दोन लाख २३ हजार ५११ रुपये, पेटी क्र. पाचमधून दोन लाख सात हजार १९१ रुपये, पेटी क्र. सहामधून दोन लाख ३७ हजार २०२ रुपये, पेटी क्र. सातमधून २३ लाख ५७ हजार ६७२ रुपये, पेटी क्र. आठमधून दोन लाख ९६ हजार १९१ रुपयांची मोजदाद करण्यात आली.
शनिवारी (ता. २१) पेटी क्र. तीन मधून चार लाख ८९ हजार ६१० रुपये, पेटी क्र. ११ मधून १३ लाख ५४ हजार ५३५ रुपये व पेटी क्र. १२ मधून सहा लाख ७७ हजार ५७३ रुपयांची मोजदाद झाली. असे एकूण एक कोटी ८४ लाख चार हजार ७० रुपयांचे दान करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या चरणी भाविकांनी अर्पण केले आहे.
नवरात्रोत्सवासाठी साकारणार गरुड मंडपाची प्रतिकृती
करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा नवरात्रोत्सव मोठ्या दिमाखात, उत्साहात साजरा होतो. यापूर्वी गरुड मंडप उतरविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, नवरात्रीच्या काळात पारंपरिक बाज हरवू नये, यासाठी त्याच ठिकाणी गरुड मंडपाची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. सध्या मंदिर परिसरातील गरुड मंडप क्रेनच्या साहाय्याने सुरक्षितपणे उतरविण्यात आला. मंदिराच्या रंगरंगोटीचेही काम सुरू आहे. मंदिराच्या स्वच्छतेनंतर गरुड मंडपाची प्रतिकृती साकारली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.