Ambabai Temple : करवीर निवासिनी अंबाबाई चरणी तब्बल दीड कोटीहून अधिक दान; पैसे, दागिन्यांसह परकीय चलनाचा समावेश

गेल्या महिन्यात सलग सुट्यांची पर्वणी साधत मोठ्या संख्येने भाविक आले.
Ambabai Temple Kolhapur
Ambabai Temple Kolhapuresakal
Updated on
Summary

यंदाच्या उन्हाळी पर्यटन हंगामात (Summer Tourist Season) मार्च ते मे या कालावधीत तब्बल २९ लाखांवर भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावली होती.

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई चरणी भाविकांनी गेल्या दीड महिन्यांत तब्बल दीड कोटींचे दान अर्पण केले आहे. गेले पाच दिवस मंदिरातील (Ambabai Temple) दानपेट्या मोजदादीसाठी खुल्या करण्यात आल्या होत्या.

आज ही प्रक्रिया पूर्ण झाली. त्यामध्ये एक कोटी ५८ लाख ९२ हजार ७०१ इतक्या रकमेचा समावेश आहे. यंदाच्या उन्हाळी पर्यटन हंगामात (Summer Tourist Season) मार्च ते मे या कालावधीत तब्बल २९ लाखांवर भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावली होती. मात्र, त्यानंतरही गेल्या महिन्यात सलग सुट्यांची पर्वणी साधत मोठ्या संख्येने भाविक आले.

Ambabai Temple Kolhapur
'मोहरम'निमित्त कोल्हापुरात मानाच्या पंजांची प्रतिष्ठापना; दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, पाहा Photo

त्यामुळे देवस्थान समितीच्या वतीने दानपेट्या मोजदादीसाठी खुल्या करण्यात आल्या. सोमवारपासून ही प्रक्रिया सुरू झाली होती. ती आज पूर्ण झाली. दरम्यान, रोख रकमेबरोबरच काही लहान दागिने, परकीय चलनही मिळाले असून, त्याचे मूल्यांकन स्वतंत्र केले जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.