'सत्तेत आलो तर तुम्हाला झेपणार नाही'

पालकमंत्र्यांकडून द्वेषाचे राजकारण; धनंजय महाडिक
'सत्तेत आलो तर तुम्हाला झेपणार नाही'
Updated on

कोल्हापूर : भाजप राज्यात (BJP) सत्तेत असताना त्रास दिला असता तर त्यांची पळताभुई थोडी झाली असती. अमल महाडिक हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे होते. मात्र आम्ही द्वेषाचे राजकारण केले नाही. आज ना उद्या आम्ही सत्तेत येणारच आहोत. एकदा का सत्तेत आलो की तुम्हाला ते झेपणार नाही, अशा शब्दांत माजी खासदार धनंजय महाडिक (dhanajay mahadik) यांनी आज टोला लगावला. भीमा सहकारी कारखाना बंद पडावा यासाठी पालकमंत्र्यांनी (satej patil) स्वतःच्या लेटरहेडवर पत्रे दिली. त्यांच्या हस्तक खासदारांनीही असेच पत्र दिले असेही त्यांनी सांगितले.

महाडिक म्हणाले, ‘‘जिल्ह्यात रत्नाप्पाअण्णा कुंभार, विरुद्ध बाळासाहेब माने, सदाशिवराव मंडलिक विरुद्ध विक्रमसिंह घाटगे यांच्यात राजकीय संघर्ष झाला; पण कोणी कोणाचा राजकीय द्वेष केला नाही. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (sahan mushrif) यांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढविलेल्या संजय घाटगे यांच्या कारखान्याला जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून सहकार्य केले. इथे मात्र उलटे आहे. सोलापूर जिल्ह्याचा आणि यांचा काही संबंध नाही. भीमा सहकारी कारखाना बंद पडावा यासाठी लेटरहेडचा वापर करून तक्रारी केल्या.

'सत्तेत आलो तर तुम्हाला झेपणार नाही'
भुईबावडा दुरुस्तीचा आराखडा बनवा ; सतेज पाटील यांची सूचना

ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकारमंत्री कारखानदारी अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ज्यांची तिप्पट एफआरपी थकित आहे त्यांच्याविषयी तक्रार केली नाही; मात्र भीमा कारखानाच दिसला. आमचीही एफआरपी (FRP) थकीत आहे, कामागारांचे पगार द्यायचे बाकी आहेत. कारखान्यावर कारवाई झालीच तर त्यावर २२ हजार जणांच्या चुली अवलंबून आहेत. ते लोक शाप देतील की चांगले म्हणतील. राजाराम कारखान्याच्या आठशे सभासदांचे सभासदत्व रद्द केले.’’

भाजपने काय केले विचारता? ४७४ कोटींचा टोल आणला कोणी आणि घालवला कोणी? त्या वेळी राजीनामा द्यायला निघाले होते. टोलची पावती फाडली कोणी असा सवाल करून महाडिक म्हणाले, ‘‘सगळ्या सत्ता हव्यात कशाला? थेट पाईपलाईनच्या नावाखाली दोन निवडणुका काढल्या. येत्या निवडणुकीत लोक पाणी पाजल्याशिवाय राहणार नाहीत. आम्ही कोणाची एक इंच जमीन बळकावली नाही आणि कंत्राटदाराकडून रुपया घेतला नाही.

'सत्तेत आलो तर तुम्हाला झेपणार नाही'
‘गोकुळ’ ची कारवाई ; दूध चोरणाऱ्या टेंपो चालकाला केला दंड

कोरोनाच्या काळात गोकुळची निवडणूक लावली त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ झाली. हे पाप लागणार आहे. घरफाळा चुकविल्याप्रकरणी आयुक्तांना माहिती दिली; पण कार्यवाही केली जात नाही. जिल्हा परिषदेत कोरोना काळात ३५ कोटींचा घोटाळा झाला. कमी वयात मंत्रिपद मिळाले आहे त्याचा सकारात्मक वापर करावा, काही लागले तर आमचीही मदत घ्या; पण द्वेषाचे राजकारण थांबवा.’’

पूरगस्तांचा कर माफ करा

सत्ताधारी मंडळींना लोकांचा कळवळा असेल तर महापुरात ज्यांचे नुकसान झाले अशांचा घरफाळा व पाणीपट्टी माफ करावी अशी मागणी महाडिक यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()