धनंजय महाडिकांनी वाढवलं शिवसेनेच्या 'या' बड्या नेत्याचं टेन्शन; कोल्हापूर उत्तरेत भाजप खेळणार नवा डाव?

Kolhapur Assembly Elections : ‘कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावर भाजपने (BJP) पहिल्यापासूनच दावा केला आहे.
Dhananjay Mahadik vs Rajesh Kshirsagar
Dhananjay Mahadik vs Rajesh Kshirsagar esakal
Updated on
Summary

‘पश्चिम महाराष्ट्रात एकूण ५८ पैकी आज महायुतीकडे ४१ जागा आहेत. यावेळी ४८ ते ४९ जागा निवडून येतील, या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत.'

कोल्हापूर : ‘कोल्हापूर दक्षिणमध्ये तुमची पंधरा हजार मते असतील तर कोल्हापूर उत्तरमध्ये आमची ८० हजार मते आहेत’, अशा शब्दांत खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांना टोला लगावला. ते माध्यमांशी बोलत होते.

Dhananjay Mahadik vs Rajesh Kshirsagar
'माझी संपूर्ण मालमत्ता बॉम्बने उडवून द्या, पण दहशतवाद्यांना..'; ताज हॉटेलवरील हल्ल्यानंतर काय म्हणाले होते रतन टाटा?

‘कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावर भाजपने (BJP) पहिल्यापासूनच दावा केला आहे. पोटनिवडणुकीत आम्ही ही जागा लढवली आहे, ८० हजार मतदान घेतले. क्षीरसागर यांनी घेतलेला मेळावा कोणावर दबाव टाकण्यासाठी असू नये. ते जर दक्षिणमध्ये आमची पंधरा हजार मते आहेत असे म्हणत असतील तर आमची उत्तरमध्ये ८० हजार मते आहेत’, असा इशारा महाडिक यांनी दिला.

Dhananjay Mahadik vs Rajesh Kshirsagar
1983 चा ऐतिहासिक World Cup विजय रतन टाटांशिवाय शक्य झाला नसता; 'या' खेळाडूंना चमकवण्यात त्यांचं मोठं योगदान

‘पश्चिम महाराष्ट्रात एकूण ५८ पैकी आज महायुतीकडे ४१ जागा आहेत. यावेळी ४८ ते ४९ जागा निवडून येतील, या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूरमधील दहापैकी चार जागा भाजपने लढवाव्यात, अशी विनंती आम्ही केली. शिवाय महायुती म्हणून जास्तीतजास्त जागा निवडून येतील, असे आमचे प्रयत्न आहेत’, असेही महाडिक यांनी स्पष्ट केले. ‘उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीमधून बाहेर पडण्याचा प्रश्नच येत नाही. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता येत असताना अजित पवार यांचा मोठा वाटा असेल’, असा दावाही त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.