खासदार महाडिकांच्या सुपुत्राची राजकारणात होणार एन्ट्री? कृष्णराज म्हणाले, 'पक्षाने संधी दिली तर निवडणूक लढवणार'

Krishnaraj Mahadik : विधानसभा निवडणुकीसाठी मी कोणत्याही पक्षाकडे उमेदवारीची मागणी केलेली नाही.
YouTuber Krishnaraj Mahadik
YouTuber Krishnaraj Mahadikesakal
Updated on
Summary

वडील खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्या राज्यसभेच्या निवडणुकीत त्यांच्याबरोबर कार्यरत होतो. त्यातून मला राजकीय क्षेत्राची आवड निर्माण झाली.

कोल्हापूर : मला राजकीय क्षेत्राची आवड आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्याही पक्षाकडे उमेदवारीची मागणी केलेली नाही; पण वरिष्ठ आणि पक्षाने संधी दिली, तर मी लढण्यास तयार असल्याचे आंतरराष्ट्रीय काररेसर आणि यू-ट्युबर कृष्णराज महाडिक (Krishnaraj Mahadik) यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

वडील खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्या राज्यसभेच्या निवडणुकीत त्यांच्याबरोबर कार्यरत होतो. त्यातून मला राजकीय क्षेत्राची आवड निर्माण झाली. कोल्हापूरच्या विकासाचे ध्येय घेऊन मी कार्यरत आहे. त्यात पहिल्यांदा शहरातील रस्त्यांसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ कोटींची निधी मंजूर केला.

YouTuber Krishnaraj Mahadik
OBC नेत्यांचा तो संशय खरा? शरद पवार फक्त मराठ्यांचे नेते यावर शिक्कामोर्तब झालंय, काय म्हणाले आंबेडकर?

त्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यासाठी खासदार महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, माजी नगरसेवक सत्यजित कदम आणि महायुतीचे पाठबळ लाभले. या निधीतून कोल्हापूर उत्तरमधील २७, तर दक्षिणमधील २३ प्रभागांतील रस्ते, ड्रेनेज व्यवस्था आदी कामे केली जातील. त्यांची सुरुवात एक ऑक्टोबरपासून करण्यात येणार असल्याचे कृष्णराज यांनी सांगितले.

Dhananjay Mahadik
Dhananjay Mahadikesakal

सुमारे अडीच कोटी रुपयांच्या निधीतून भिमा स्विमिंग टॅंकचे नूतनीकरण करण्यासह तेथे स्पोर्टस् ॲकॅडमी सुरू केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. रूपाराणी निकम, स्मिता माने, उमा इंगळे, नंदकुमार मोरे, नीलेश देसाई, किरण नकाते, विलास वास्कर, पृथ्वीराज महाडिक आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.