Panhala Fort : शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी! पन्हाळगडावरील कुलूपबंद धर्मकोठी खुली करण्याच्या हालचाली

अनेक वर्षे कुलूपबंद असलेली ऐतिहासिक धर्मकोठी (Historical Dharamkothi) ही इमारत खुली करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
Panhalgad Fort Archaeology Department kolhapur
Panhalgad Fort Archaeology Department kolhapuresakal
Updated on
Summary

शिवकाळात म्हणजे सोळाव्या शतकात रयतेकडून रोख रकमेऐवजी धान्य रूपात कर गोळा व्हायचा.

पन्हाळा : पन्हाळगडावरील गेली अनेक वर्षे कुलूपबंद असलेली ऐतिहासिक धर्मकोठी (Historical Dharamkothi) ही इमारत खुली करण्याच्या हालचाली सुरू आहेत. याबाबत पुरातत्त्वच्या अधिकाऱ्यांनी सूतोवाच करून इमारतीची स्वच्छता करण्यास सुरुवात केली. यामुळं शिवप्रेमींतून समाधान व्यक्त होत आहे.

Panhalgad Fort Archaeology Department kolhapur
Gadhinglaj : नेहमी आजीजवळ झोपणाऱ्या अर्जूनला 'त्या' रात्री वडिलांनी बोलावून नेलं अन् रक्ताच्या थारोळ्यात..

शिवकाळात म्हणजे सोळाव्या शतकात रयतेकडून रोख रकमेऐवजी धान्य रूपात कर गोळा व्हायचा. संस्थानात जमलेले धान्य पन्हाळगडावरील (Panhalgad Fort) गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन धान्य कोठारात जमा व्हायचे आणि ते धान्य सैनिकांना, तसेच गोरगरीब जनतेला धर्मकोठी या इमारतीतून वाटले जायचे.

काही वर्षांपूर्वी याच इमारतीत न्यायालय आणि नंतर पोलिस ठाणे होते. पोलिस ठाण्याला पागा इमारतीची जागा मिळाली. त्यानंतर ही इमारत पुरातत्त्व खात्यानं ताब्यात घेतली. तेव्हापासून तिला टाळे आहे. कालानुरूप इमारतीचे दरवाजे, खिडक्या आता खराब झाल्या.

Panhalgad Fort Archaeology Department kolhapur
Solapur : महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? दहा पदाधिकाऱ्यांच्या निवडी, जातीय समिकरणाची जुळवाजुळव

मध्यंतरी या इमारतीची दुरुस्ती करून घेऊन रंगकाम केल्याने इमारतीला ऊर्जितावस्था आली, पण खात्याने इमारतीत शिल्लक बांधकाम कामाच्या सळ्या, सिमेंट ठेवल्याने इमारतीला ओंगळ स्वरूप आले होते. दोनच दिवसांपूर्वी या इमारतीतील लोखंडी सळ्या व अन्य साहित्य काढले आहे.

वस्तू संग्रहालय शक्य

या इमारतीत पावनगडावर सापडलेले तसेच तीन दरवाजा, पुसाटी बुरुज येथील तटबंदीत सापडलेले शेकडो तोफगोळे ठेवले आहेत. येथे वस्तू संग्रहालय झाले तर या तोफगोळ्यांसह अन्य ऐतिहासिक वस्तू, शस्त्रे, शिलालेख ठेवले जातील आणि पर्यटकांना ते पाहता येतील.

Panhalgad Fort Archaeology Department kolhapur
Karad : उदयनराजे-शिवेंद्रराजे वादावर राऊतांचा थेट प्रहार; म्हणाले, 'हा तर छत्रपतींच्या गादीचा अपमान..'

धर्मकोठीची सध्या स्वच्छता सुरू असून, लवकरच ही इमारत लोकांच्या मागणीनुसार खुली करण्यात येईल, तसेच इथे पुरातन वस्तूंचे संग्रहालय चालू होईल.

- विजय चव्हाण, पुरातत्त्व अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.