पुरात अडकलेल्या श्वानास नदीकाठावर आणताच ठोकली धूम

Dhoom knocked as soon as the dog was brought to the river bank
Dhoom knocked as soon as the dog was brought to the river bank
Updated on

कोल्हापूर : कसबा बावडा येथील पंचगंगा नदीत राजाराम बंधाऱ्याला लागून असलेल्या एका शेडवर पाच दिवसांपासून पुराच्या पाण्यात अडकलेल्या श्‍वानाला आपत्ती व्यवस्थापन पथकातील जवानांनी जीवदान दिले. भुकेने व्याकूळ झालेल्या आणि चार दिवस भुंकत असलेल्या या श्‍वानाला नदीकाठावर आणताच त्याने धूम ठोकली. 
शहरात 3 ऑगस्टपासून पावसाला सुरूवात झाली. चार दिवसांत पचंगंगेने धोक्‍याची पातळी ओलांडली. पंचगंगेच्या पाण्याने या परिसराला वेढा दिला होता. त्यात नदीकाठाला लागून असलेल्या एका हॉटेलची पूर्ण इमारत पाण्याखाली गेली होती. या हॉटेलच्या शेडवर 3 ऑगस्टपासून एक श्‍वान अडकून पडले होते. भुकेने व्याकूळ झाल्याने ते जिवाच्या आकांताने ओरडत होते. स्थानिक तरूणांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधून या श्‍वानाला पाण्याबाहेर काढण्याची विनंती केली. 
काल दुपारी बारा वाजता आपत्ती व्यवस्थापनाचे एक पथक पंचगंगा स्मशानभूमी परिसरात दाखल झाले. या पथकातील बोटीद्वारे काही जवान पाण्यातून त्या शेडपर्यंत गेले. या शेडवर बसलेल्या या श्‍वानाला त्यांनी बोटीत घेतले. नदीकाठावर दत्त मंदीराच्या पिछाडीस या श्‍वानाला घेऊन बोट आल्यानंतर त्याला बाहेर काढले. बाहेर काढताच या श्‍वानाने धूम ठोकली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()