दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये होणार कर्मवीरांच्या स्मृतींचे दालन

जुन्या छायाचित्रांसह विविध वस्तूंचे करणार जतन व संवर्धन
दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये होणार कर्मवीरांच्या स्मृतींचे दालन
दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये होणार कर्मवीरांच्या स्मृतींचे दालन
Updated on

कोल्हापूर : कर्मवीर भाऊराव पाटील यांचे स्मृती दालन आता दसरा चौकातील दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये साकारले जाणार आहे. कर्मवीर भाऊराव पाटील या बोर्डिंगमधील सात क्रमांकाच्या खोलीत वास्तव्याला होते. त्यामुळे बोर्डिंगने पहिल्यापासून या खोलीच्या निमित्ताने कर्मवीर अण्णांच्या स्मृती जपल्या आहेत. ही खोली विद्यार्थ्यांना राहण्यासाठी कधीच दिली जात नाही. याच खोलीत लवकरच विविध जुन्या छायाचित्रांसह अण्णांच्या वापरातील वस्तूंचे जतन केले जाणार आहे.

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यात शिक्षणाचे जाळे निर्माण केले. मात्र, ते विद्यार्थिदशेत असताना मार्च १९०७ ते एप्रिल १९०८ या काळात कर्मवीर भाऊराव पाटील बोर्डिंगमध्ये वास्तव्यास होते. बोर्डिंमध्ये अण्णांच्या उपस्थितीत नंतरच्या काळातही काही कार्यक्रम झाले. याबाबतच्या नोंदी अनेक जुन्या कागदपत्रांसह पुस्तकातही आहेत. दिगंबर जैन बोर्डिंगने या साऱ्या गोष्टी जतन करून ठेवल्या आहेत. त्याशिवाय कर्मवीर अण्णांच्या जीवनातील अनेक छायाचित्रे प्रसिद्ध आहेत.

दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये होणार कर्मवीरांच्या स्मृतींचे दालन
Karmaveer Bhaurao Patil Jayanti 2021: कर्मवीरांचे विद्यार्थी वसतिगृह व्यवस्थापन

मात्र, फारशी कुठेही प्रकाशित नसणारी जुनी व दुर्मिळ छायाचित्रे बोर्डिंगच्या माध्यमातून संकलित केली जात आहेत. ही सर्व छायाचित्रे आणि अण्णांच्या वापरातील वस्तूंचा स्मृती दालनात समावेश असेल. प्रत्येक वर्षी अण्णांच्या जयंती व स्मृतीदिनाचे कार्यक्रम याच खोलीत होतात, असे बोर्डिंगचे अधीक्षक राजकुमार चौगुले, प्रा. संदीप पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.