कोल्हापूर : जिल्हा व सत्र न्यायालयात ‘ई सेवा केंद्र’ उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामार्फत खटल्याची माहिती, सुनावणीची तारीख, न्यायालयीन कामकाजासाठी आवश्यक कागदपत्रे, स्कॅनसह न्यायाधीन बंदीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी ई मुलाखतीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ई सेवा केंद्राची सुरुवात २३ नोव्हेंबर २०२० पासून सुरू झाली. यामार्फत सर्वोच्च आणि उच्च न्यायालय कायदेशीर सेवा समिती, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडून विनामूल्य कायदेशीर सेवांबद्दलचे मार्गदर्शन दिले जाते. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या तारखा, ई मेल अगर व्हॉटस्ॲपच्या माध्यमातून न्यायालयीन आदेशांची व निर्णयांची स्वॉफ्ट कॉपी देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. या केंद्रास आतापर्यंत आठ हजार ४५३२ पक्षकारांनी भेटी दिल्या आहेत. त्यांना वरील सेवा आणि मार्गदर्शनही देण्यात आले आहे.
कळंबा मध्यवर्ती कारागृह आणि बिंदू चौक सबजेल येथील बंदीशी त्यांच्या नातेवाईकांची आणि वकिलांची भेट होण्यासाठी ई मुलाखतीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ई मुलाखतीसाठी आतापर्यंत २९८ अर्ज दाखल झाले असून, त्यांतील २४७ नातेवाईक-वकिलांची भेट घडवून दिल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पंकज देशपांडे यांनी पत्रकाद्वारे दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.