जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा सिंधुदुर्गात आज निषेध दिन

जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा सिंधुदुर्गात आज  निषेध दिन
Updated on

कुडाळ (सिंधुदुर्ग) : शासनाच्या वाहनधारकांबाबत घेण्यात येणाऱ्या चुकीच्या धोरणांबाबत आज (ता.२८) एकदिवसीय निषेध दिन करण्यात येणार आहे. यापुढेही दरवाढ सुरू राहिली अथवा दरात योग्य घट न झाल्यास ऑगस्ट २०२१ मध्ये आपली वाहने आहे त्या ठिकाणी बेमुदत थांबविण्याचा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनने दिला आहे. (district-transport-association-protest-of-the-government-agitation-today-in-sindhudurg)

याबाबत ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस, नवी दिल्ली या देशव्यापी संघटनेचे निमंत्रित सदस्य मनोज वालावलकर यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन ही मालवाहतूकधारांचे प्रतिनिधित्व करणारी संघटना आहे. आम्ही ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस, नवी दिल्ली (AIMTC) या देशव्यापी, शिखर संघटनेशी संलग्न आहोत. आजच्या कोविड-१९ च्या काळात, डिझेलवरील कर रूपाने जमा होणारा महसुल राष्ट्र उभारणी कामात निश्चितच उपयुक्त ठरेल. मालवाहतूक व्यवसाय हा पूर्णपणे "मागणी व पुरवठा" या तत्त्वावर चालतो आहे. २०१९ पासून व्यापार, उद्योग कमी अधिक प्रमाणात बंद आहेत. संघटनेच्या देशव्यापी सभासदांच्या झूमद्वारे झालेल्या बैठकीत सातत्याने सुरु असलेल्या डिझेल दरवाढीबाबत अत्यंत संतापी प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यामुळे देशभरातील माल वाहतुकदार उद्या एक दिवसाचा लाक्षणिक संप करणार आहेत.

या दिवशी माल वाहतुकदार दंडावर काळी फित बांधुन सातत्याने होत असलेल्या डिझेल दरवाढीचा निषेध नोंदवणार आहेत. जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन ही व देशव्यापी संघटना यामध्ये सहभागी होणार आहोत. यापुढेही दरवाढ सुरू राहिली अथवा दरात योग्य घट न झाल्यास ऑगस्ट २०२१ मध्ये आपली वाहने आहे. त्या ठिकाणी बेमुदत थांबविण्याची निर्णय नाईलाजाने घेतला जाईल, असा इशारा दिला आहे. विविध मागण्याबाबत बोलताना श्री. वालावलकर म्हणाले, ``मालवाहतूक व्यवसाय हा पूर्णपणे "मागणी व पुरवठा" या तत्त्वावर चालतो आहे. २०१९ पासून व्यापार, उद्योग कमी अधिक प्रमाणात बंद आहेत. व्यवसायातच ४० ते ५० टक्के झालेली घट आणि डिझेल दरात ३० टक्केपर्यंत झालेली वाढ यांचा ताळमेळ घालून व्यवसाय करणे अत्यंत अवघड झाले आहे.

सुविधांची मागणी

ट्रान्स्पोर्ट व्यवसायाला इंडस्ट्रीजचा दर्जा व सवलती मिळाव्यात. जो वाहनचालक कोविड कालावधीत वाहन चालवतो त्यालाळ'कोरोना योध्दाद्धा’ सन्मान मिळावा, आरोग्य विषयक सवलती मिळाव्यात. ३० सप्टेंबर पर्यंत सर्व वाहन कागदपत्रांना शासनाने मुदतवाढ दिली आहे. असे असतानाही वाहतुकींना तपासणीच्या नावाखाली थांबवून त्यांची पिळवणूक केली जाते तसेच ई-चलन नावाखाली ट्रॅफिक पोलीस, हायवे ट्रॅफिक व संबंधीत प्रशासन यांचेकडून कार्यवाही केली जाते ती त्वरीत थांबवावी, अशीही मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.