महाराष्ट्र केसरी गणपतराव खेडकरांच्या गदांचे गूढ कायम

महाराष्ट्र केसरी गणपतराव खेडकरांच्या गदांचे गूढ कायम
Updated on

नवेखेड (सांगली) : पहिले डबल महाराष्ट्र केसरी गणपतराव खेडकर (Double Maharashtra Kesari Ganapatrao Khedkar) यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या चांदीच्या दोन्ही गदा गेल्या अनेक वर्षांपासून गायब आहेत. पहिले काही दिवस नवे खेडमध्ये (Navekhed) असलेल्या या गदा पुढे कोल्हापुरातील गंगावेस तालमीत (Gangaves Talmi in Kolhapur) व काका जमदाडे यांच्याकडे असल्याची सांगोपांगी माहिती खेडकर कुटुंबीयांकडे आहे. नुकताच खेडकरांचा आठवा स्मृतिदिन झाला. या वेळी खेडकरांच्या स्मृती जागविताना कुस्तीप्रेमींनी त्यांच्या गदांचा शोध घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. (double-maharashtra-kesari-ganapatrao-khedkar-wrestling-memorial-day-sangli-news)

नवेखेडसारख्या खेड्यातून कोल्हापूरच्या शाहू विजयी गंगावेस तालमीत ते कुस्तीचे धडे गिरवण्यासाठी गेले. सहा फुट उंचीच्या ताडमाड खेडकरांनी अवघ्या २१ व्या वर्षी १९६४ साली अमरावती येथे तिपन्ना अंकलीकर या सोलापूरच्या मल्लास चित्रपट करीत महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. त्यानंतर दुसऱ्या वर्षी नाशिकला मोहनसिंग भिसेनी या वर्ध्याच्या मल्लास चित्रपट करीत दुसऱ्यांदा हा बहुमान मिळवला. पाच वेळा ऑल इंडिया नॅशनल चॅम्पियनशिपचा बहुमान त्यांनी मिळविला. दीनानाथ सिंह, आप्पासाहेब कदम, नामदेव मोळे, संभाजी पाटील आजगावकर, टोपाना गोजगे असे मल्ल त्यांनी घडविले. ही सारी मंडळी पुढे महाराष्ट्र् केसरी ठरले.

कोल्हापूरच्या जनतेने हत्तीवरून काढलेली गुरुशिष्य मिरवणूक
कोल्हापूरच्या जनतेने हत्तीवरून काढलेली गुरुशिष्य मिरवणूक

रुस्तम- ए- हिंद हरिश्चंद्र बिराजदार या त्यांच्या पठ्ठयाने महाराष्ट्रावर चाल करून आलेल्या दिल्लीचे प्रसिध्द मल्ल सतपाल यांना चितपट केले.त्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राने या गुरुशिष्याच्या जोडीला कौतुकाच्या शिखरावर चढवले. कोल्हापूरात तर त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली.त्यांच्या या साऱ्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या चांदीच्या गदा मात्र आता गायब आहेत. सुरवातीच्या काही दिवस गावी आणि नंतर गंगावेस तालमीत या गदा ठेवल्याचे जुने जाणते लोक सांगतात. त्यानंतर त्या गदा कुस्ती ठेकेदार काका जमदाडे यांच्याकडे ठेवण्यास होत्या. कुस्तीतील कारकीर्द संपल्यानंतर खेडकर गावी परतले.

सतपाल विरुद्ध लढणाऱ्या हरिश्चंद्र बिराजदार यांचा कसून सराव घेताना खेडकर
सतपाल विरुद्ध लढणाऱ्या हरिश्चंद्र बिराजदार यांचा कसून सराव घेताना खेडकर

कालांतराने जमदाडे यांचेही निधन झाले. आता खेडकर यांच्या निधनाला आठ वर्ष लोटली मात्र त्यांच्या त्या गदा गेल्या कोठे हे कुटुंबियांना समजलेले नाही. अलीकडे खेडकर यांचे चिरंजीव नेताजी चव्हाण (खेडकर) यांनी या गदा मिळविण्यासाठी जमदाडे यांच्या कुटुंबियांकडे चौकशी केली असता त्यांनी याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले. या गदा म्हणजे कोल्हापूर- सांगलीच्या कुस्तीपरंपरच्या अभिमानाची प्रतिके आहेत. त्यामुळे त्यांची जपणूक गरजेची आहे. त्यामुळेच या गदांचा शोध गरजेचा आहे.

महाराष्ट्र केसरी गदेसह खेडकर
महाराष्ट्र केसरी गदेसह खेडकर

डबल महाराष्ट्र केसरीच्या वाट्याला आर्थिक स्‍थैर्य कधी आले नाही. त्यांचा स्वभाव सडेतोड-मानी होता. १९८० च्या दशकात ते कोल्हापूरहून गावी परतले. ते घडले ती गावातील तालीमही जमीनदोस्त झाली आहे. तिचे पुनरुज्जीवन व्हावे, तिथे त्यांचे प्रेरणादायी स्मारक व्हावे, कुस्तीगीर परिषद तसेच गंगावेस तालमीच्या विश्‍वस्तांनी खेडकरांच्या पराक्रमाच्या साक्ष देणाऱ्या गदा शोधल्या पाहिजेत.

- नेताजी चव्हाण (खेडकर)/

- गणपतराव खेडकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()