Lockdown Update: प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांचं 'आपत्ती'ला थेट पत्र

Lockdown  Update: प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांचं 'आपत्ती'ला थेट पत्र
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील आरटीपीसीआर चाचणीच्या आधारे सरासरी कोरोना पॉझिटिव्हीटी दर 10 टक्के पेक्षा कमी म्हणजे सरासरी 9.09 टक्के इतका आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरात  सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत सर्व दुकाने, आस्थपना सुरु करण्यास परवानगी मिळावी, असे पत्र प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे (dr kadambari balkawade) यांनी आपत्ती व्यवस्थापन, (Disaster Management) मदत आणि पुनवर्सनचे प्रधान सचिवांना दिले आहे. (dr-kadambari-balkawade-get-permission-to-start-an-all-shop-letter-by-disaster-management-kolhapur-lockdown-treding-news)

कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक़ झाली.  जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हीटीचा आणि शहरातील पॉझिटीव्हिटीचा आढावा घेण्यात आला.  शहरातील कोरोना पॉझिटिव्हीटीचा दर 10 टक्के पेक्षा कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शासनाच्या नियमानूसार दहा टक्केपेक्षा कमी पॉझिटिव्हीटी असणाऱ्या शहरातील सर्व दुकाने व आस्थाना आठवड्यातील सोमवार व शुक्रवार दरम्यान सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत सुरु करता येणार आहे. त्यानूसार आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनवर्सनच्या प्रधान सचिवांना आज पत्र पाठविण्यात आले आहे.   

डॉ. बलकवडे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना पॉझिटिव्हीटी दर जिल्ह्यापेक्षा कमी आहे. कोल्हापूर जिल्हा हा एकच घटक धरण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांना आणि दुकानदारांना आपला व्यवसाय आणि व्यापार बंद ठेवावा लागत आहे. 6 एप्रिल 2021 पासून सर्व व्यवसाय, दुकाने बंद आहेत. त्यानूसार 28 जून 2021 ला कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँण्ड इंडस्ट्रिज व इतर व्यापारी अशोसिएशनने शहरातील सर्व प्रकारची दुकाने दुपारपर्यंत सुरु ठेवली होती. भविष्यातही हा प्रश्‍न समोर येवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवू शकतो.

कोल्हापूर शहरातील लोकप्रतिनिधी व व्यापाऱ्यांकडून दुकाने सुरु करण्यासाठी वारंवार मागणी केली जात आहे. त्यानूसार महापालिकेने दिलेल्या प्रस्तावावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाशी चर्चा करुन व निर्बंधांमध्ये काही बदल करावेत, अशी मागणी होत आहे. यासाठी मागील आठवड्याचा आढावा ही घेण्यात आला आहे. दरम्यान, शहरातील पॉझिटिव्हीटी रेट कमी असल्याने केवळ कोल्हापूर शहरातील दुकाने सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत सुरु ठेवण्यास कोणतीही हरकत नाही, अशी विनंतीही डॉ. बलकवडे यांनी केली आहे.

 हेही वाचा- कोल्हापुरात चौथ्या स्तराचे निर्बंध कायम

असा काढला पॉझिटिव्हीटी रेट

कोल्हापूर जिल्ह्यात 25 जून ते 1 जुलै दरम्यान आरटीपीसीआरचा सरासरी पॉटिव्हिटी दर हा 13.8 टक्के आहे. ऑक्‍सिजन बेड वर 55.9 टेक्‍क रुग्ण आहेत. याउलट कोल्हापूर शहरात 17 जून ते 23 जून दरम्यान कोरोना पॉझिटिव्हीटी दर हा 7.5 टक्के तर 24 जून ते 30 जून दरम्यान 9.09 टेक्‍क आहे. त्यामुळे किमान कोल्हापूर शहरातील दुकाने व सर्व आस्थापना सुरु करता येणार आहे. यासाठी कोल्हापूर शहरातील दुकाने सुरु करण्यास परवानी मागितली आहे. 

डॉ. कांदबरी बलकवडे यांच्याकडे प्रभारी जिल्हाधिकारी पद

जिल्हाधिकारी दौलत देसाई हे चार आठवडे रजेवर आहेत. त्यामुळे प्रभारी जिल्हाधिकारी म्हणून महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. आज सकाळी त्यांनी आपला पदभार स्विकारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.