देशभरातील विविध विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांमध्ये ‘आयुका’ची तीस संदर्भ केंद्र सुरू करण्याचा देखील विचार असल्याचे प्रा. आर. श्रीआनंद यांनी सांगितले.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे (Shivaji University) पन्हाळा अवकाश केंद्र संशोधनासाठी (Panhala Space Center Research) एकदम भारी ठिकाण आहे. तेथे खगोलशास्र आणि खगोल भौतिकशास्राच्या अनुषंगाने इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अॅन्ड ॲस्ट्रोफिजिक्स (आयुका) च्या माध्यमातून संयुक्तपणे संशोधन केले जाईल, अशी माहिती ‘आयुका’चे संचालक प्रा. डॉ. आर. श्रीआनंद यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.