प्रतिभा पाटील या सांगली येथील साहित्य संमेलनासाठी जाणार होत्या. त्यांचे विमान कोल्हापुरात उतरले होते. येथे जेवण करून त्या सांगलीकडे रवाना झाल्या होत्या.
कोल्हापूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या दौऱ्यामुळे जिल्ह्यात पूर्वी येऊन गेलेल्या राष्ट्रपतींच्या स्मृती जागवल्या गेल्या. यापूर्वी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (Dr. Sarvepalli Radhakrishnan) आणि प्रतिभा पाटील (Pratibha Patil) जिल्ह्यात आले होते. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे दोन वेळा आले होते. मात्र, त्यावेळी ते राष्ट्रपती नव्हते.