Kolhapur: सहकारी संस्थांनी देशात दारिद्र्य निर्मूलन, अन्नसुरक्षा, नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मात्र, झपाट्याने बदलणाऱ्या काळात सहकारी संस्थांनीही स्वत:ला बदलण्याची गरज आहे.
त्यांनी अधिकाधिक नवतंत्रज्ञानाचा वापर करून प्रगती साधावी, तसेच व्यवस्थापनाला व्यावसायिक बनवावे,’ अशी अपेक्षा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज येथे व्यक्त केली. महिलांच्या संघटन शक्तीला पुढे नेण्यासाठी वारणा समूह प्रयत्न करीत असून, त्याचे मला समाधान वाटते, असेही त्या म्हणाल्या.