Krishna River : महापुरात वाहून गेलेल्या बेपत्ता इकबाल बैरागदार यांचा अद्याप शोध नाहीच; दोघांचा मृतदेह सापडला, पण..

Krishna River Flood : केळीच्या बागेत जाण्यासाठी निघालेले आठजण ट्रॅक्टर उलटून महापुरात वाहून गेल्याची दुर्घटना घडली होती.
Krishna River Flood
Krishna River Floodesakal
Updated on
Summary

आमदार यड्रावकर यांनी कर्नाटक राज्यापर्यंत सोमवारपासून शोध मोहीम करावी, अशी सूचना तहसीलदार हेळकर व रेस्क्यू फोर्सच्या जवानांना केली आहे.

कुरुंदवाड : अकिवाट (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीतील (Krishna River Flood) दुर्घटनेतील बेपत्ता माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार (Iqbal Bairagdar) यांचा आजही शोध लागला नाही. या दुर्घटनेतील ट्रॅक्टर व ट्रॉली क्रेनच्या सहाय्याने निघेल त्याचवेळी बैरागदार यांचाही शोध लागेल, अशी आशा होती. मात्र, शोध लागला नाही.

शुक्रवारी (ता. २) सकाळी (Akiwat Shirol) कृष्णा नदीला आलेल्या महापुराच्या पाण्यातून गावाचा पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी आणि केळीच्या बागेत जाण्यासाठी निघालेले आठजण ट्रॅक्टर उलटून महापुरात वाहून गेल्याची दुर्घटना घडली होती. आठपैकी पाचजण वाचले.

मात्र, तिघेजण वाहून गेले. त्यापैकी सुहास पाटील यांचा मृतदेह घटनास्थळाजवळ सापडला, तर शनिवारी (ता.३) माजी सरपंच आण्णासाहेब सुरेंद्र हसुरे (वय ५५) यांचा मृतदेह शनिवारी मिळाला होता. याच घटनेत बैरागदार वाहून गेले होते. त्यांच्या शोधासाठी तीन दिवसांपासून एनडीआरएफचे पथक, वजीर रेस्क्यू फोर्स, व्हाईट आर्मीसह रेस्क्यू फोर्सतर्फे ७ यांत्रिक बोटींद्वारे पत्रातील कडेला पाणी ढवळून शोधमोहीम सुरू आहे.

मात्र, आजही निराशाच झाली. सायंकाळी ट्रॅक्टर-ट्रॉली काढताना नागरिक, नातेवाईकांच्या नजरा घटनास्थळाकडे लागल्या होत्या. मात्र, काहीच निष्पन्न झाले नाही. आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, तहसीलदार अनिलकुमार हेळकर, गटविकास अधिकारी नारायण घोलप, नायब तहसीलदार योगेश जमदाडे दिवसभर ठाण मांडून होते.

आमदार यड्रावकर यांनी कर्नाटक राज्यापर्यंत सोमवारपासून शोध मोहीम करावी, अशी सूचना तहसीलदार हेळकर व रेस्क्यू फोर्सच्या जवानांना केली आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून पानबुडीच्या साह्याने शोधमोहीम करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.