मागील २५ वर्षे संशयित आरोपीने फिर्यादीचे नाव वापरून बनावट आधारकार्ड, मतदार ओळखपत्र वगैरे कागदपत्रे तयार केली आहेत.
गोकुळ शिरगाव : लहान भावाची कागदपत्रे वापरून सैन्य दलात भरती (Army Recruitment) झालेल्या मोठ्या भावाविरोधातच संबंधित लहान भावाने गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात (Gokul Shirgaon Police Station) तक्रार दिली. गेल्या २५ वर्षांपासून ही फसवणूक होत असून दहावी नापास तरुणाच्या या कृत्याने पोलिसही चक्रावले आहेत. विठ्ठल ऊर्फ उत्तम सदाशिव यादव (वय ३८, रा. कणेरी, ता. करवीर) असे संशयिताचे नाव आहे.