बॅटरीचा प्रकाश पडताच हत्तीने ठोकली धूम 

Elephants Again In The Uttur Area Kolhapur Marathi News
Elephants Again In The Uttur Area Kolhapur Marathi News
Updated on

उत्तूर : हालेवाडी तिठ्ठा येथे धगररांचा बकऱ्याचा तळ बसलेला. रात्री अकरा वाजता तळावरील चार कुत्री जोरजोराने भुंकू लागली. धनगरांनी उठून पाहिले, तर 10 फुटावर भला मोठा हत्ती उभा राहिलेला. सर्वांनी जोर-जोरात आरडा-ओरडा करायला सुरवात केली. बॅटरीचा प्रकाश हातीच्या तोंडावर मारला यामुळे हत्ती थोडा बिथरला आणि त्याने हालेवाडी गावच्या दिशेने धूम ठोकली. विठ्ठल खद्दी व हालाप्पा खद्दी या धनगरांनी मोठ्या धाडसाने हत्तीला पिटाळून लावले. 

उत्तूर परिसरात मंगळवारी रात्री पुन्हा हत्तीचे आगमन झाले. आजरा परिसरातून मडिलगे जंगलातून हा हत्ती आला. हालेवाडी पठारावर धनगरांचा बकऱ्यांचा तळ बसवला आहे. तळावरील कुत्री जोरजोराने भुंकू लागली यामुळे धनगरांना जाग आली. दहा फुटावर त्यांना हत्तीचे दर्शन झाले. हत्ती हालेवाडीच्या दिशेने निघून गेला. 

हालेवाडी येथे अंतोनी फर्नांडिस यांच्या शेतातील संरक्षणासाठी लावलेली तार तोडून हत्तीने शेतात प्रवेश केला. ऊस पिकात धुडगूस घातला. उसाच्या पिकात हत्तीचे पायाचे ठसे व विष्ठा आढळली. तो कर्पेवाडीच्या दिशेने निघून गेला. या ठिकाणी दयानंद केसरकर यांच्या शेतात हत्तीच्या पायाचे ठसे आढळले. हा हत्ती चव्हाणवाडी येथील जोमकाईदेवी डोंगरातून धामणे मार्गे चिकोत्रा नदीकडे निघून गेला. 

दक्षतेचा इशारा 
दरम्यान, वन विभागाने या परिसराची पाहणी केली. हत्ती भुदरगड परिसरात गेला असल्याची शक्‍यता वन विभागाने वर्तविली. दक्षतेचा इशारा म्हणून जवळपासच्या गावाना संस्कार वाहिनीवरून माहिती देण्यात आली. 
 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.