विचलित झालेल्या हत्तींना डिवचणे धोकादायक

आजऱ्याच्या जंगलातील चाळोबा गणेश सहा महिन्यांत तिसऱ्यांदा नागरी वस्तीकडे
विचलित झालेल्या हत्तींना डिवचणे धोकादायक
Updated on

कोल्हापूर : आजरा, चंदगड, भुदरगड (Ajra, Chandgad,Bhudargad) भागात हत्तींचे वास्तव्य नवा विषय नाही. यात तीन वर्षांपासून गर्द जंगलात फेरफटका मारणारा चाळोबा गणेश हल्ली अधूनमधून बिथरत आहे. चंदगड तालुक्यातील पाटण्याचा दुसरा मोठा टस्कर हत्ती (Elephants) आजऱ्याच्या चाळोबा जंगलात आला. नव्या सोबत्याच्या हालचालीमुळे चाळोबा गणेश विचलित झाला असावा, असा अंदाज आहे. विचलित झालेला हत्ती जंगलाबाहेर आल्यानंतर गर्दी गोंगाटामुळे तो अधिक विचलित होऊ शकतो. अशा जंगली हत्तींना डिवचणे हेच धोकादायक असते, असे मत हत्तींच्या हालचाली, निरीक्षणे नोंदवणारे वनपाल दत्ता पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.

Summary

चार गावांच्या हद्दीतील जंगलातून शेतीत व शेतीतून रस्त्यावर, तेथून नागरीवस्तीत आला.

ते म्हणाले, ‘‘आजऱ्याच्या जंगलातील चाळोबा गणेश सहा महिन्यात तिसऱ्यांदा नागरी वस्तीकडे आला. चार गावांच्या हद्दीतील जंगलातून शेतीत व शेतीतून रस्त्यावर, तेथून नागरीवस्तीत आला. त्याने गावात फेरफटका मारला. दोन चार ठिकाणी रस्ता चुकला; पण वन विभागाने त्याला पुन्हा जंगलाच्या दिशेने हुसकावले. चंदगड, आजरा, भुदरगड भागात हत्तींचा वावर नियमित असतो; मात्र बहुतांशवेळा जंगलातील हत्ती एखाद्या वेळेस नागरीवस्तीत येतात. अचानक जंगलाबाहेर येणारे हत्ती पुन्हा त्यांच्याच मार्गाने जंगलातही जातातही. मात्र, अनेकदा बघ्यांची गर्दी, हुल्लडबाजीमुळे हत्तीला जंगलाकडे परतताना दिशाभुलीची शक्यता वाढते. यात हत्ती बिथरला तर अनर्थ होऊ शकतो. त्यामुळे आलेल्या हत्तीला त्याच्या कलाने जंगलाच्या दिशेने पाठविण्यात वन विभाग कर्मचारी प्रयत्न करतात. त्यांना सहकार्य करणे अपेक्षित आहे.’’

विचलित झालेल्या हत्तींना डिवचणे धोकादायक
पूररेषेचा होणार अभ्यास ; जाणकार व तज्ज्ञांची समिती नियुक्त

पाटील म्हणाले, ‘‘आजऱ्यातील चाळोबा जंगलात तीन वर्षांपासून मोठ्या हत्तीचे वास्तव्य आहे. तो चाळोबाच्या जंगलात राहतो म्हणून चाळोबा गणेश नावाने त्याची ओळख आहे. त्याचा एक दात अधर्वट आहे. यावरून तो हत्ती चाळोबा जंगलातील असल्याची ओळख पटते. अनेक महिने तो एकटाच जंगलात वास्तव्य करत होता. मात्र, गेल्या महिन्यात पाटणेतील मोठा हत्ती पाटणे चंदगडमार्गे आजऱ्याच्या जंगलात आला. तिथे हे दोन्ही हत्ती काही दिवस एकत्र होते. मधूनच ते दोघेही स्वतंत्र झाले. गर्द जंगलांत त्यांचे द्वंद्व झाले असावे असा अंदाज आहे. पाटण्याकडून आलेला हत्ती वयाने विशीचा व अधिक धिप्पाड आहे. त्याच्या हालचालीने चाळोबा गणेश अस्वस्थ होऊन जंगलातून भरकटत बाहेर आला असावा. जंगलाहद्दीलगतच्या फुललेल्या शेतीतून पुढे मडिलगे गडहिंग्लज हद्दीपर्यंत आला असावा.’’

गोंगाट, मानवी हस्तक्षेप वाढतो त्या जागेवरून हत्ती पुन्हा स्थलांतर करतो किंवा आक्रमक होतो. नेमका असाच गोंगाट आजही झाल्याने हत्तीला जंगलाकडे परतवताना वन विभागाला कसरत करावी लागली. असे प्रकार अनेकदा घडतात. मात्र, विचलित झालेला हत्ती अधिक आक्रमक होण्याची शक्यता असते. हत्तीजवळ जाणे, मोबाईल शूटिंग, आरडाओरडा, गाड्या रेस करणे असे अनुचित प्रकार न करता हत्ती दिसेल तेथून लोकांनी दूर जाणे हिताचे.

-दत्ता पाटील, वनपाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.