मृत परीट हा विद्यामंदिर शाळेजवळच्या 'पटकी' नावाच्या शेतात जनावरांना वैरण आणण्यासाठी सकाळच्या सुमारास गेला होता.
कोनवडे : वैरणीचा भारा अंगावर पडून लोटेवाडी (ता. भुदरगड) येथील शेतकऱ्याचा मृत्यू झाला. धोंडिराम मारुती परीट (वय ३२) असे शेतकऱ्याचे (Farmer) नाव आहे. घटनेची नोंद भुदरगड पोलिसात (Bhudargad Police) झाली आहे. सात्तापा दादू परीट यांनी घटनेची फिर्याद दिली.