Ambeohal Dam : जलसमाधीसाठी जाणाऱ्या आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांना पोलिसांनी रोखले; काय आहे नेमकं प्रकरण?

आंबेओहळ मध्यम प्रकल्पातील (म) प्रकल्पग्रस्त शेकऱ्यांचे पुनर्वसन रखडले आहे.
Ambeohal Project Kolhapur Police
Ambeohal Project Kolhapur Policeesakal
Updated on
Summary

प्रकल्पग्रस्त जलआंदोलन करणार हे गृहित धरून महसूल विभागाने आजराऱ्यातून आपती व्यवस्थानाच्या दोन पाणबोटी आणल्या होत्या. फायर टँक, आरोग्य पथक तसेच पोलिस बंदोबस्तही होता.

उत्तूर : आरदाळ-पास्टेवाडी (उत्तूर) दरम्यान साकारलेल्या आंबेओहळ मध्यम प्रकल्पातील (म) प्रकल्पग्रस्त शेकऱ्यांचे पुनर्वसन रखडले आहे. याच्या निषेधार्थ ३५५ प्रकल्पग्रस्त शेतकरी काल प्रकल्पस्थळावर मोर्चानी आले. प्रकल्पातील पाण्यात जलसमाधी घेण्याची भूमिका त्यांनी घेतली. मात्र, पोलिसांनी (Police) प्रकल्पाच्या गेटवर मोर्चा अडवला. यावेळी पोलिसांशी आंदोलकांची झटापट झाली. यानंतर झालेल्या चर्चेत प्रशासनाच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेतले. महिन्यात मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुन्हा १० आॕगस्टला आंदोलनाचा इशारा दिला.

यावेळी जमीन आमच्या हक्काची, धरण आमच्या हक्काचे, अशा घोषणा दिल्या. प्रकल्पात एकूण ८२२ खातेदार आहेत, यापैकी ३५५ शेतकऱ्यांना मागणी नसताना निवाड्यातील सर्व रक्कम उचला व तुम्हाला भरघोस स्वेच्छा पुनर्वसन देऊ असे आमीष दाखवून तत्कालीन भूसंपादन अधिकाऱ्यांनी तुटपुंज्या रकमेवर शेतकऱ्यांची (Farmers) जमीन संपादन केली. बेकायदेशीर स्वेच्छा निवाडे करून एकरी एक लाख सात हजार इतके तुटपुंजे अनुदान मंजूर केले.

Ambeohal Project Kolhapur Police
Anganwadi Sevika : 'माझी लाडकी बहीण योजने'चा फॉर्म भरताना कार्यालयातच अंगणवाडी सेविकेचा Heart Attack ने मृत्यू

काही सुशिक्षित शेतकऱ्यांनी तत्कालीन अधिकाऱ्यांना न जुमानता निवाड्यातील रकमेपैकी ६५ टक्के रक्कम भरून पर्यायी जमीन किंवा विशेष आर्थिक पॅकेज एकरी १४ लाख ४० हजार इतके भरघोस अनुदान मिळवले. एक प्रकल्प, एक निवाडा, जमिनीही एकच मग स्वेच्छा पुनर्वसन व आर्थिक पॅकेजमध्ये फरक का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडल्यानंतर यातील २०० शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने ते प्रकल्पग्रस्त आहेत ते तपासा, असतील तर त्यांची ६५ टक्के रक्कम भरून घ्या, असा आदेश दिला.

मात्र, तत्कालीन जिल्हा पुनर्रचना अधिकारी तुषार ठोंबरे यांनी कार्यवाही केली नाही. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यासाठी शेकडो बैठका घेतल्या. मात्र, प्रशासन निर्णय घेत नाही. याच्या निषेधार्थ आजचे आंदोलन झाले. संजय येजरे म्हणाले, ‘धरण हे आमचे जिवंत स्मारक आहे. अधिकाऱ्यांनी आमच्या मागण्यांना पाने पुसली आहेत. यामुळे आम्ही आता तरणार नाही तर प्रकल्पात मरणार आहे. यामुळे जलआंदोलन अडवू नये.’

संजय येजरे, शंकर पावले, अंबाजी पाटील, मच्छिंद्र कडगावकर, शशिकांत लोखंडे यांनी नियोजन केले. पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता शिल्पा राजे मगदूम, उपविभागीय अधिकारी अविनाश फडतरे, प्रकल्प अधिकारी दिनेश खट्टे, महसूलचे प्रांताधिकारी मल्लिकाअर्जुन माने, तहसीलदार समीर माने यांनी पुनर्वसनाबाबत प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली.

Ambeohal Project Kolhapur Police
14 जुलैला हिंदू समाजाला विशाळगडावर बोलावून संभाजीराजे दुफळी माजवत आहेत का? विश्‍व हिंदू परिषदेचा सवाल

मोबाईलवरून पालकमंत्र्यांशी संपर्क

पुनर्वसनासह काहीप्रश्नावर अधिकारी निरुत्तर झाले. आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष वसंतराव धुरे, संचालक काशिनाथ तेली, संभाजी तांबेकर यांनी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अधिकाऱ्यांना समजावून सांगितले. तेली यांनी मोबाईलवरून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संपर्क साधला. मोबाईल माईकद्वारे मुश्रीफ यांनी धरणग्रस्तांशी संवाद साधला.

पाणबोट, फायर टँक अन् पोलिस बंदोबस्त

प्रकल्पग्रस्त जलआंदोलन करणार हे गृहित धरून महसूल विभागाने आजराऱ्यातून आपती व्यवस्थानाच्या दोन पाणबोटी आणल्या होत्या. फायर टँक, आरोग्य पथक तसेच पोलिस बंदोबस्तही होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.