Kolhapur Politics Satej Patil Dhananjay Mahadik
Kolhapur Politics Satej Patil Dhananjay Mahadikesakal

Kolhapur Politics : एकाच प्रसिद्धी पत्रकावर कट्टर विरोधक सतेज पाटील, धनंजय महाडिकांचे झळकले PHOTO, लोकांना बसला धक्का

आमदार पाटील आणि खासदार महाडिक यांचे फोटो एकाच प्रसिद्धी पत्रकावर पाहून लोकांना धक्का बसला आहे.
Published on
Summary

एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) आणि आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांचे हे हसरे फोटो पाहून जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला आहे.

कोल्हापूर : पालकमंत्री हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी), उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (भाजप), खासदार धनंजय महाडिक (भाजप), आमदार सतेज पाटील (काँग्रेस), आमदार पी. एन. पाटील (काँग्रेस) व आमदार विनय कोरे (जनसुराज्य शक्ती) यांचे फोटो शेतकरी सहकारी संघाच्या निवडणूक (Farmers Cooperative Union Election) प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या पत्रकावर प्रसिध्द केले आहेत.

याच प्रसिध्दीपत्रकावर जिल्ह्यात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) आणि आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांचेही हसरे फोटो पाहून जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी शेतकरी संघाला बळकटी मिळावी. संघ चांगल्या नेतृत्वाकडे जावा, यासाठी मंत्री पाटील, आमदार पाटील, खासदार महाडिक, आमदार पी. एन. पाटील व आमदार कोरे यांच्यासोबत राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी पॅनेलची बांधणी केली.

Kolhapur Politics Satej Patil Dhananjay Mahadik
Hasan Mushrif : 'मी आणि संजय घाटगेंनी सर्व निवडणुकांत एकत्र काम करण्याची शपथ घेतलीये, आमच्या मैत्रीला दृष्ट लागू नये'

गयामध्ये प्रत्येक आमदार व खासदार यांना ठरावीक जागांचे वाटप केले. यामुळे संघाची निवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, शेवटपर्यंत याला यश आले नाही. आता याच नेत्यांचे विषेशत: आमदार पाटील आणि खासदार महाडिक यांचे फोटो एकाच प्रसिद्धी पत्रकावर पाहून लोकांना धक्का बसला आहे. या निमित्ताने शेतकरी सहकारी संघाची निवडणूक सर्वांपर्यत पोहोचली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()