देसाई कुटुंब उद्ध्वस्त; वडिलांसह 2 सख्ख्या भावांचा कोरोनाने मृत्यू

एकाच कुटुंबातील वडिलांसह व दोन कर्त्या तरुण मुलांचा मृत्यू
देसाई कुटुंब उद्ध्वस्त; वडिलांसह 2 सख्ख्या भावांचा कोरोनाने मृत्यू
Updated on

कोनवडे : कूर (ता. भुदरगड) येथील एकाच (bhudargad, kur) कुटुंबातील वडिलांसह (father and two brother) व दोन कर्त्या तरुण मुलांचा एक आठवड्यात मृत्यू झाला. यामुळे देसाई कुटुंबियांवर नियतीचा मोठा आघात झाला असून पूर्ण कुटुंब उद्धवस्त झाले आहे. वडील बाजीराव रावसो देसाई (वय ८५) धनाजी बाजीराव देसाई (वय ४८) नेताजी बाजीराव देसाई (वय ४४) या तिघांचा कोरोनाने बळी घेतला. (corona)

कूर येथील ट्रक व्यवसायिक असलेले हे देसाई कुटुंब अनेक वर्षे व्हणगुत्तीजवळील शेत मळ्यात राहत आहे. त्यांचे वडील बाजीराव देसाई हे सहा वर्षे आजारी असल्याने अंथरुणावर खिळून होते. त्यांचे निधन शुक्रवारी (११) रोजी झाले. वडिलांच्या रक्षाविसर्जना दिवशीच धनाजी व नेताजी या दोन सख्ख्या भावांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांचे स्वॅब कोरोना पॉझिटिव्ह आले. उपचारादरम्यान त्यांची तब्बेत खालावत गेल्याने डॉक्टरांचे प्रयत्न अपयशी ठरले व लहान भाऊ नेताजी देसाई याच्यापाठोपाठ दोन दिवसांत मोठा भाऊ धनाजी देसाई याचे निधन झाले.

देसाई कुटुंब उद्ध्वस्त; वडिलांसह 2 सख्ख्या भावांचा कोरोनाने मृत्यू
विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत राहीचा सुवर्णवेध

दोन कर्त्या मुलांसह वडिलांचे सलग मृत्यू झाल्याने देसाई कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेने गाव हादरले आहे. मृत देसाई कुटुंबातील पत्नी, मुले, भावजय व चुलते असे ९ जण कोरोनाबधित झाले. त्यांच्यावर गारगोटी येथे कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार घेणाऱ्या कुटुंबियांना दोन सख्या भावांच्या मृत्यूची माहिती दिली नव्हती. सर्वजण उपचारानंतर घरी आल्यानंतर त्यांना मृत्यूची माहिती देताच कुटुंबियांनी (desai family) केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. देसाई कुटुंबीय अनेक वर्षे गावापासून दूर शेतातील घरी राहत होते. तेथे कोरोनाचा झालेला शिरकाव देसाई कुटुंब उध्वस्त करणारा ठरला. शांत, संयमी, मनमिळावू स्वभावाच्या धनाजी व नेताजी यांचा मित्रपरिवार मोठा आहे. त्यांच्यामागे आई, पत्नी, मुले, भावजय, मुली असा मोठा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.