रागाच्या भरात शंकरने अंघोळीची बादली ओंकारच्या डोक्यात मारली. यामध्ये ओंकारच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात (Kalamba Central Jail) एकमेकांना शिवीगाळ केल्यानंतर कैद्यांमध्ये वाद झाला. त्याचे पर्यवसन मारामारीत झाले. कैद्यांनी लाथाबुक्क्यांनी एकमेकांना मारहाण केली. यामध्ये ओंकार प्रदीप पाटील (वय ३०, रा. राजारामपुरी) जखमी झाला आहे.
याप्रकरणी किरण बबन साळुंखे, शंकर पारवे (दोघेही रा. शिराळा, जि. सांगली) यांच्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात (Rajwada Police) गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी : खंडणी, अपहरण, बलात्काराच्या गुन्ह्यात गेल्या वर्षापासून ओंकार पाटील कळंबा कारागृहात शिक्षा भोगत आहे. किरण साळुंखे, शंकर पारवे खुनाच्या गुन्ह्यात कळंबा कारागृहात गेल्या दीड वर्षापासून आहेत. तिघेही कळंबा कारागृहाच्या सर्कल क्रमांक पाचमधील बरॅक क्रमांक तीनमध्ये आहेत.
शुक्रवारी (ता. १२) सायंकाळी ओंकार व किरण यांच्यामध्ये वादावादी झाली. याचदरम्यान ओंकारने किरणला शिवीगाळ केला. यातून दोघांमध्ये वादावादी सुरू झाली. काही वेळातच या दोघांमधील वाद हातघाईवर आला. यामध्ये शंकर पारवेने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यालाही ओंकारने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
यामुळे रागाच्या भरात शंकरने अंघोळीची बादली ओंकारच्या डोक्यात मारली. यामध्ये ओंकारच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या प्रकाराची माहिती मिळताच कारागृहातील पोलिसांनी तत्काळ धाव घेत दोघांना वेगवेगळ्या बरॅकमध्ये हलविले. ओंकारला उपचारासाठी कारागृहातील रुग्णालयात ठेवण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.