खासदार माने, आमदारपुत्र राहुल आवाडेंच्या वाहनचालकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी; मुश्रीफांच्या दौऱ्यावेळी नेमकं काय घडलं?

शब्दाला शब्द वाढत गेल्यामुळे दोन्ही वाहनचालकांनी हाणामारी करण्यास सुरुवात केली.
MP Dhairyasheel Mane vs Rahul Awade Ichalkaranji
MP Dhairyasheel Mane vs Rahul Awade Ichalkaranjiesakal
Updated on
Summary

हाणामारीचे व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाले. इचलकरंजीत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री मुश्रीफ, खासदार माने येथे आले होते.

इचलकरंजी : खासदार धैर्यशील माने (MP Dhairyasheel Mane) व आमदारपुत्र राहुल प्रकाश आवाडे (Rahul Prakash Awade) यांच्या वाहनचालकांमध्ये काल घोरपडे नाट्यगृह येथे जोरदार हाणामारी झाली. वाहन मागे-पुढे घेताना सुरू झालेला वाद अगदी फ्री स्टाईल हाणामारीपर्यंत पोहचला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर हा वाद थांबला. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या दौऱ्यावेळी हा प्रकार घडला.

MP Dhairyasheel Mane vs Rahul Awade Ichalkaranji
US Woman Sindhudurg: भयंकर! कोकणातील जंगलात अमेरिकन महिला साखळदंडांनी बांधलेल्या अवस्थेत सापडली; ४० दिवस अन्नपाण्याविना विना..

हाणामारीचे व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाले. इचलकरंजीत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री मुश्रीफ, खासदार माने येथे आले होते. पूर पाहणीनंतर त्यांचा ताफा पूरग्रस्त छावणी असलेल्या घोरपडे नाट्यगृह येथे आला.

सर्वजण नाट्यगृहात गेल्यानंतर पार्किंगसाठी वाहने मागे-पुढे करताना खासदार माने व आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांच्या वाहनांमध्ये घासाघासी झाली. त्यामुळे दोन्ही वाहनांच्या चालकांमध्ये वादावादी सुरू झाली. त्यानंतर शिवीगाळ सुरू झाली. शब्दाला शब्द वाढत गेल्यामुळे दोन्ही वाहनचालकांनी हाणामारी करण्यास सुरुवात केली. अगदी कमरेचा पट्टा काढून एकमेकांवर तुटून पडले. त्यामुळे अचानक वातावरण तापले.

MP Dhairyasheel Mane vs Rahul Awade Ichalkaranji
आलमट्टीतील विसर्ग कायम राहिल्यास सांगली, कोल्हापूर, बेळगावमधील पूरस्थिती कमी होणार; सध्या किती लाख विसर्ग सुरु?

या ठिकाणी अन्य अधिकारी व पदाधिकारी यांच्या वाहनांच्या चालकांनी दोघांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शिवीगाळ करीत एकमेकांना खुन्नस दाखवित अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. या प्रकाराचे काहीजण चित्रीकरण करीत असल्याचेही त्यांना भान राहिले नाही. आरडाओरड सुरू असल्याचे पाहून पोलिस अधिकारी तेथे आले. त्यानंतर पोलिसांनी दोघांना बाजूला करीत वाद शांत केला. सर्वासक्षम घडलेल्या या घटनेची कोणतीही नोंद पोलिस ठाण्यात झाली नाही; मात्र दोन जबाबदार नेत्यांच्या चालकांमध्ये अचानक झालेल्या हाणामारीच्या प्रकाराची शहरात जोरदार चर्चा सुरू होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()