पंधरा दिवसाचे आयुष्य असणाऱ्या काजव्या विषयी हे माहित आहे का?

पंधरा दिवसाचे आयुष्य असणाऱ्या काजव्या विषयी हे माहित आहे का?
Updated on

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा जैवविविधता संपन्न असा जिल्हा आहे. अनेक भागात घनदाट झाडी, दऱ्या खोरी औषधी वनस्पती यामुळे या भागात पक्षी, प्राणी आणि कीटक मोठ्या प्रमाणात आहेत. जडीबुटी चा खजिना स्वच्छ हवा मुबलक पाणी यामुळे या ठिकाणी निसर्गाचा एक अनमोल ठेवा या जिल्ह्याला लाभलेला आहे. भौगोलिक परिस्थिती ने समृद्ध असलेल्या जिल्ह्यात प्रत्येक ऋतू मध्ये एक वेगळे अद्भुत असे नैसर्गिक जीवसृष्टी पाहायला मिळते. निसर्ग पर्यटन, (Nature tourism)पर्यटनासाठी तर हा जिल्हा प्रसिद्ध आहे त्याचबरोबर हा जिल्ह्या छोटे छोटे पक्षी आणि प्राण्यांचे वैशिष्ट्याने समृद्ध आहे. आपण जाणून घेणार आहोत त्याचं नाव आहे काजवा. (firefly) काजवा म्हणजे नेमका काय, त्याची उत्पत्ती कशी झाली, या लाईफ सर्कलमध्ये त्याचं काय महत्त्व आहे आज आपण जाणून घेणार आहोत.(firefly-radhanagari-campaign-life-cycle-marathi-news)

काजव्याला इंग्रजीमध्ये लेपीरेडी असे म्हणतात. काजवा हा निशाचर भुंगा आहे. जगभरामध्ये याच्या दोन हजार प्रजाती असून अंटार्टिका खंड सोडून हा कीटक सर्व खंडावर आढळतो.कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी,भुदरगड ,चंदगड पन्हाळा ,बावडा, शाहूवाडी या तालुक्यात काजवा पाहायला मिळतो. हा काजवा मे महिन्याच्या मध्यापासून ते जून पर्यंत पाहायला मिळतो.पंधरा दिवसांच्या या त्यांच्या कालावधीमध्ये या त्यांचे वास्तव्य असणाऱ्या भागांमध्ये निसर्गाचे एक अद्भुत रूप पाहायला मिळते. आणि हाच अद्भुत पणा पाहण्यासाठी आता निसर्गप्रेमींना तसेच पर्यटकांना हे भाग खुणावत आहेत. रात्रीच्या अंधारामध्ये हजारोच्या संख्येने चमकणारे हे काजवे मनाला एक वेगळा स्पर्श करून जातात आणि याचेच दर्शन घडवण्यासाठी राधानगरी मध्ये स्थानिक बायसन नेचत क्लब तर्फे काजवा महोत्सव घेतला जातो.मार्चनंतर उन्हाळ्याचे दिवस सुरू होतात उष्णता वाढू लागते. उकाडा वाढू लागतो आणि या दिवसातच पावसाच्या सरी अधून मधून सुरु व्हायला लागतात. हवेत थंडपणा येऊ लागतो आणि यावेळी राधानगरीत सुरू होतो एक विलक्षण जीवन प्रवास. खरंतर काजव्यांचा आयुष्यमान हे खूप थोडेथोडके असते.

असा असतो काजवा

काजवा म्हणजे असा एक कीटक जो अंधारात प्रकाश देतो. हा काजवा वर्षभर पालापाचोळा आणि झाडांच्या खोडावर राहत असतो. वळीव पावसानंतर हा काजवा बाहेर येण्यास सुरुवात करतो. काजव्याला सहा पाय आणि पंखांच्या दोन जोड्या असतात. तो हवेत उडू शकतो. काजव्याच्या जीवन चक्राचे मुख्यत्वे तीन विभाग असतात. अंडी, अळी, कोश असा फुलपाखरासारखा जीवनमान असते.या काजव्याचे दोन आठवड्यात प्रवर रूपांतर होते. प्रौढ झाल्यानंतर काजवा स्वयंप्रकाशित बनतो. हा काजवा दिरडा, बेरडा, जांभूळ या झाडावरच बसत असतो.

काजव्याचे खाद्य

काजवा ओलसर जागी असलेला गोगल गायला खातो. कोळी, बेडुक इत्यादी पक्षांचे तो स्वतः खाद्य बनतो.

काजवा का चमकतो

काजवाच्या शेपटीत एक अवयव असतो. त्यामध्ये लूसीपीरियल नावाचे केमिकल तयार होते. या केमिकलची ऑक्सिजनची विक्रिया झाली की, त्यामधून प्रकाश बाहेर पडतो. त्याला आपण काजव्यांची चमकणे म्हणतो.

विजेच्या प्रकाशात आणि काजव्यांचा प्रकाश आत असणार्‍या फरक

आपल्याकडेच विज असते त्या प्रकाशाने उष्णता निर्माण होते. काजव्यांचा प्रकाश उष्ण प्रकाश नसून तो शित प्रकाश असतो.

काजवा लाईफ सर्कल

मे महिन्याच्या मध्यापासून जून महिन्यापर्यंत त्यांचा प्रजननाचा काळ असतो. आपल्या जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी प्रकाश करून हे चमकत असतात. हा त्यांचा मेटिंग काळ असतो. नर आणि मादी यांच्या मिलनानंतर नराचा जीवन क्रम संपतो. मादी पालापाचोळा ओलसर जमिनीत अंडी देते.

काजव्यांच्या मधील हा नैसर्गिक पणाच निसर्गप्रेमींना आकर्षित करणारा असतो कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तसेच आंबा घाट परिसरात मोठ्या प्रमाणात हे काजवे चमकताना दिसतात. त्याबाबतची संपूर्ण माहिती मिळावी या उद्देशाने या ठिकाणी हे चमकणारे काजवे दाखवण्यासाठी महोत्सव भरवला जातो. कोणत्याही नैसर्गिक प्रक्रियेत अडथळा आणू न देता आणि पर्यटकांच्या मुळे या लहान जीवांच्या जीवनचक्रात समस्या येऊ नयेत याची काळजी घेत स्थानिक निसर्गप्रेमी हे बाहेरून आलेल्या पर्यटकांना याचे अद्भूत दर्शन घडवतात. त्यामुळेच मे महिन्याचा शेवटचा आठवडा काजव्याचे वास्तव्य असणाऱ्या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होतात. निसर्गातील हा छोटा घटक पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये जगण्याचा एक नवीन अध्याय देऊन जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.