बंगळूर - लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेतून परदेशात अमली पदार्थांची तस्करी करणारे प्रकरण केंद्रीय अबकारी खात्याने उघडकीस आणले आहे. आज केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अंदाजे पाच कोटी रुपयांचे पाच किलो एफिड्रीन ड्रग जप्त करण्यात आले. आठवडाभरातील ही दुसरी घटना असून, १८ फेब्रुवारीलाही पाच कोटी रुपये किमतीचे ‘एफिड्रीन’ जप्त करण्यात आले होते.
यापूर्वी १८ फेब्रुवारीला सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी तपासणी करताना लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेतून ऑस्ट्रेलियात पुरवठा होणारा एफिड्रीन ड्रग जप्त केला होता. अमली पदार्थांची तस्करी आढळून आल्यानंतर विमानतळावर अतिदक्षता बाळगण्यात आली होती. आज तपासणीवेळी पुन्हा एकदा लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेत ड्रग आढळून आले आहे. चेन्नईमध्ये लग्न होत असल्याचे दाखवून त्याची आमंत्रण पत्रिका तयार केली होती. ही लग्नपत्रिका आकर्षकपणे तयार केली आहे. लग्नपत्रिकेच्या दोन कोपऱ्यावर दोन छोटे मंगलकलश बसविण्यात आले असून प्रत्येक कलशामध्ये ६० ग्रॅम एफिड्रीन भरण्यात आले होते. आमंत्रण पत्रिकेवरील कव्हर देखिल जाड ठेवण्यात आले असून त्यात देखिल एफिड्रीन भरण्यात आले होते. प्रत्येक लग्नपत्रिकेत १२० ग्रॅम एफिड्रीन आढळून आले आहे. असे ८५ पॉलिथीन कव्हर आढळून आले असून सुमारे पाच किलो एफिड्रीन सापडले आहे.
आठवडाभरात दोन वेळा असे प्रकरण उजेडात आले असल्याने कस्टम अधिकाऱ्यांनी केंद्रीय अर्थ आणि महसूल खात्याच्या माध्यमातून याची चौकशी हाती घेतली आहे. तमिळनाडुतील मदुराई येथून कुरीयरद्वारे हे पार्सल आले आहेत. निमंत्रण पत्रिकेसोबत धोतर, साड्या देखिल गिफ्टपॅक केल्या आहेत. ऑस्ट्रेलियातील सिडनीला ते पाठविले जाणार होते. कस्टम अधिकाऱ्यांनी एनडीपीएस अंतर्गत ही तक्रार दाखल करून घेतली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.