अवघ्या एक हजार रुपयांत भाजप घडविणार 5 हजार नागरिकांना अयोध्या दर्शन; धनंजय महाडिकांची माहिती

भारतीय जनता पक्षातर्फे (BJP) जिल्ह्यातील पाच हजार जणांना अवघ्या एक हजार रुपयांमध्ये अयोध्या दर्शन घडवण्यात येणार आहे.
Dhananjay Mahadik
Dhananjay Mahadikesakal
Updated on
Summary

यासाठी नागरिकांना अवघे एक हजार रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. या हजार रुपयांमध्ये प्रवास, जेवण, राहणे, दर्शन, रेल्वेतील जेवण असा सर्व खर्च करण्यात येणार आहे.

कोल्हापूर : ‘भारतीय जनता पक्षातर्फे (BJP) जिल्ह्यातील पाच हजार जणांना अवघ्या एक हजार रुपयांमध्ये अयोध्या दर्शन घडवण्यात येणार आहे. मंगळवारी (ता. १३) रात्री ९.३० वाजता अयोध्येला जाणारी ही विशेष रेल्वे (Railway) कोल्हापुरातून जाणार आहे. अयोध्येला जाण्यासाठी भाजप कार्यालय, जिल्हाध्यक्ष यांच्याकडे नोंदणी करावी,’ असे आवाहन खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी पत्रकार परिषदेत केले.

Dhananjay Mahadik
Maratha Reservation : मराठा समाजाचे 98 टक्के सर्वेक्षण पूर्ण; 468 कुटुंबांनी दिला सर्वेक्षणास नकार

खासदार महाडिक म्हणाले, ‘भारतीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या प्रभू रामचंद्रांचे मंदिर (Ayodhya Ram Temple) पाचशे वर्षांनंतर साकार होत आहे. त्यामुळे प्रत्येकालाच रामाच्या दर्शनाची ओढ आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षातर्फे जिल्ह्यातील पाच हजार नागरिकांना अयोध्या दर्शन घडवून आणण्यात येणार आहे. यासाठी मंगळवारी (ता. १३) विशेष रेल्वेचे आयोजन करण्यात आले आहे.

Dhananjay Mahadik
बसरीकट्टीत आढळले श्रीरामचे प्राचीन शिल्प! मंदिर उभारण्यासाठी गावकऱ्यांच्या हालचाली, काय आहे खासियत?

यासाठी नागरिकांना अवघे एक हजार रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. या हजार रुपयांमध्ये प्रवास, जेवण, राहणे, दर्शन, रेल्वेतील जेवण असा सर्व खर्च करण्यात येणार आहे. यानंतरही फेब्रुवारी आणि मार्चमध्ये आणखी रेल्वेचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी पक्ष कार्यालयात तसेच जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांच्याकडे नोंदणी करावी. पक्षाचे सरचिटणीस डॉ. सदानंद राजवर्धन यांच्याकडे या उपक्रमाचे नियोजन आहे.’ पत्रकार परिषदेला प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल देसाई, राजवर्धन निंबाळकर, रुपाराणी निकम, हेमंत अराध्ये, विजयेंद्र माने उपस्थित होते.

देशात १९ कोटी लाभार्थी

महाडिक म्हणाले, ‘अर्थसंकल्पात प्रत्येक घटकाचा विचार केला आहे. शासकीय योजनांचा लाभ आता शेवटच्या घटकापर्यंत पोहचत आहे. भारत विकास संकल्प यात्रेच्या माध्यमातून देशातील १९ कोटी लोकांना अवघ्या दोन महिन्यात शासकीय योजना मिळाल्या आहेत.’

Dhananjay Mahadik
Loksabha Election : महाविकास आघाडी 48 जागा लढविणार, 'या' जागा ठरणार निर्णायक; काय म्हणाले आमदार जगताप?

खासदार राहणार गावात

‘भाजपतर्फे गाव चलो अभियान राबवण्यात येणार आहे. यामध्ये खासदार, आमदार आणि पक्षाचे पदाधिकारी जिल्ह्यातील एका गावात २४ तास राहाणार आहेत. तर ग्रामीण भागातील पदाधिकारी शहरात राहणार आहेत. या २४ तासात त्यांनी १८ प्रकारचे उपक्रम राबवायचे आहेत. यातून प्रत्येक घटकाशी संवाद साधता येणार आहे,’ असेही महाडिक यांनी सांगितले. खासदार महाडिक चंदगड तालुक्यातील राजगोळी या गावात जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.