बंगळूर घटनेचे कोल्हापुरात पडसाद ; कर्नाटकी मालकांची हॉटेलं बंद

शिवरायांच्या पुतळा विटंबनेचा केला निषेध सभा
 कोल्हापूर ः बंगळूर (कर्नाटक) मध्ये समाजकंटकांकडून शिवाजी महाराज यांच्या पुळ्याची विटंबनेच्या निषेध करत येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक घातला. याप्रसंगी कार्यकर्ते.
कोल्हापूर ः बंगळूर (कर्नाटक) मध्ये समाजकंटकांकडून शिवाजी महाराज यांच्या पुळ्याची विटंबनेच्या निषेध करत येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक घातला. याप्रसंगी कार्यकर्ते.Esakal
Updated on

कोल्हापूर : बंगळूर (कर्नाटक) मध्ये (Bengaluru) समाजकंटकांकडून सदाशिवनगरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj)पुळ्याची विटंबना करुन व्हीडिओ व्हायरल केला आहे. याचे पडसाद आज कोल्हापुरात (Kolhapur)उमटले. कोल्हापुरात हर्षल सुर्वे (Harshal Surve) यांच्या मार्गदर्शनाखाली शिवभक्तांनी रात्री शहरातील कर्नाटकी मालकांची हॉटेल बंद पाडली. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी' अशा घोषणा देत कर्नाटकमधील भाजप सरकारचा निषेध केला. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिषेक घातला.(Flash protest against desecration of Shivaji statue)

काही दिवसापूर्वी लाल-पिवळ्याची होळी केली, म्हणून भगवाच्या बदला घेण्यासाठी हे कृत्य केल्याचे त्या समाजकंटकांकडून व्हायरल व्हिडिओमधून सांगण्यात आले आहे. बंगळूरू येथे सदाशिवनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्‍वारुढ पुतळा आहे. गुरुवारी रात्री काही समाजकंटकांनी या पुतळ्याची विटंबना केली. विटंबना करतानाचा व्हिडिओही जाणीवपूर्वक व्हायरल केला आहे. त्यामुळे बंगरूळसह कोल्हापूर जिल्ह्यातही रात्री याचे पडसाद उमटले आहेत.

Summary

समाजकंटकांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत दुकाने उघडायची नाही, असा इशारा दिला आहे.

 कोल्हापूर ः बंगळूर (कर्नाटक) मध्ये समाजकंटकांकडून शिवाजी महाराज यांच्या पुळ्याची विटंबनेच्या निषेध करत येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक घातला. याप्रसंगी कार्यकर्ते.
समाजकंटकांकडून बंगळूरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना

शिवभक्तांनी कोल्हापूरसह परिसरातील कानडी लोकांची दुकाने बंद पाडून जोपर्यंत "त्या' समाजकंटकांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत दुकाने उघडायची नाही, असा इशारा दिला आहे. लक्ष्मीपुरी, कळंबा, राजारामपुरी, मंगळवारपेठेसह शहराबाहेरील उपनगरातील हॉटेल बंद पाडली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीची विटंबना करणाऱ्यांना धडा शिकवला जाईल. तत्पूर्वी, कर्नाटक शासनाने त्या समाकंठकावर तात्काळ कारवाई केली पाहिजे. अशी मागणी सुर्वे यांनी केली.

आज सर्वपक्षीय एकत्र येणार

बंगरूळू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्यामुळे याचा निषेध करण्यासाठी शनिवार(ता.१८) सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी पुतळा येथे दुपारी १२ ला उपस्थित राहावे, असे आवाहन सर्वपक्षीय कार्यकर्ते व शिवप्रेमींनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.