प्रयाग चिखली : साहेब मागच्या टायमाला तुम्ही आणि चंद्रकांत दादा आलते. दादांनी पण शब्द दिला होता. नाही म्हणत नाही. दादा तुम्ही शब्द दिला होता. याच मंदिरात मारुती साक्षी आहे. त्यांनंतर दोन वर्ष कुठे गेले प्रशासन. तुम्ही बघितलं नाही आणि आज आमच्याकडे दोन वर्षे झाली आणि आज तुम्ही परत आला इथं. असंच तुम्ही आता आश्वासन देणार एकदा व जाणार, आम्ही आमच्या कामाला लागणार तुम्ही तुमच्या कामाला लागणार, परत आमच्याकडे कोणी बघत नाही साहेब, अशा शब्दात आंबेवाडी येथील आप्पासाहेब कोळेकर यांनी आपल्या भावना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर व्यक्त केल्या.
फडणवीस आज आंबेवाडी (ता. करवीर) गावातील पुरस्थिती पाहणीसाठी आले होते. यावेळी श्री. फडणवीस बोलण्यासाठी उठताच कोळेकर यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. यामुळे काहीकाळ या भेटीचे वातावरण बदलले. पण नंतर कोळेकर यांना शांत करत श्री. फडणवीस यांनी आपले भाषण सुरू केले. शासनाने १९८९मध्ये आंबेवाडी गावातील लोकांचे स्थलांतर सोनतळी येथे केले; पण अजूनही प्लॉट ताब्यात दिले नाहीत. वेळोवेळी मागणी करुनही आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. कोल्हापुर रत्नागिरी महामार्गावर भरावामुळे रस्त्यावर पंधरा फूट पाणी असते. शेतीचे आतोनात नुकसान होते .चिखली, आंबेवाडी येथे तीन दिवस पाऊस पडला की पूर येतो, अशीही गाऱ्हाणी काही पूरग्रस्तांनी मांडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.