आलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग वाढविण्याची मागणी समितीने केली होती. मात्र, फारशी दखल घेतली नाही.
कोल्हापूर : कोयना, चांदोली, राधानगरी धरणांतून विसर्ग सुरू होत आहे. यातून महापुराचा धोका असल्याने आलमट्टीतून (Almatti Dam) साडेतीन लाख विसर्ग सुरू करावा, अशी मागणी कृष्णा महापूर नियंत्रण समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे, अशी माहिती समितीचे निमंत्रक विजयकुमार दिवाण यांनी दिली.
श्री. दिवाण यांनी दिलेली माहिती अशी की, पंचगंगा नदीच्या (Panchganga River) पाण्याने इशारा पातळी ओलांडली आहे. एक-दोन दिवसांत राधानगरी धरणाचे (Radhanagari Dam) स्वयंचलित दरवाजे उघडणार आहेत. यात कोयना धरणातून विसर्ग वाढवला आहे, तर चांदोली धरणाचे (Chandoli Dam) दोन दरवाजे उघडले आहेत. हेच पाणी कृष्णा पात्रात येत आहे.
आलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग वाढविण्याची मागणी समितीने केली होती. मात्र, फारशी दखल घेतली नाही. यानंतर समितीचे एक पथक आलमट्टी व हिप्परगीत गेले. तेथे कर्नाटक जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन पूरस्थिती गंभीर असल्याचे सांगितले. यानंतर कोल्हापूर, सांगली जलसंपदा विभागानेही पाठपुरावा केला. त्यानंतर आलमट्टीचा विसर्ग ६५ हजार क्युसेकवरून एक लाख व पुढे दीड लाख क्युसेक वाढवला.
त्यानंतर ७२ तासांने आलमट्टीच्या पाण्याची हिप्परगी बंधाऱ्यापर्यंत आलेली फुग सोमवारी कमी झाली. कृष्णेचे पाणी पुढे सरकले. मंगळवारी (ता.२३) सांगलीतील आयर्विन पुलाजवळील पाणी मंगळवारी सकाळी ८ वाजता २ फुटाने कमी झाले. पंचगंगेचे पाणी आज बुधवारी (ता.२४) स्थिर होईल. दोन दिवसांनी हळूहळू पातळी कमी होईल. आलमट्टीचा विसर्ग कमी केल्यास व पावसाचा जोर वाढल्यास गंभीर स्थिती ओढावू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.