कोल्हापूर : शहरातील बहुतांशी भागात पाणी रस्त्यावर आल्याने वाहुतीच्या मार्गात बदल करण्यात आला. व्हिनस कॉर्नर, लक्ष्मीपूरी (कोंडाओळ) खानविलकर पेट्रोलपंप, टाकाळा या परिसरातील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली. शहरातील छोटे नाले, ओढे यातील पाणी पात्राबाहेर पडले. या पाण्याचा प्रवाह इतका होता, की येथून संथगतीने वाहतूक सुरू होती. त्यामुळे शहरात सर्वत्रच वाहतुकीची कोंडी झाली होती. पंचगंगा नदी व जयंती नाल्याचे पाणी रस्त्यावर आल्याने बाहेरून शहरात ये-जा करण्यासाठी केवळ उमा टॉकीज ते टाकाळा हा एकच मार्ग खुला होता. या मार्गावर तर वाहतुकीची प्रचंड मोठी कोंडी झाली होती. ती दूर करण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांना मात्र चांगलीच दमछाक करावी लागत होती.
मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीचे आणि जयंती नाल्याचे पाणी शहरातील अनेक भागात पसरले. त्यामुळे पहाटेपासूनच दसरा चौक ते मध्यवर्ती बसस्थानक हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. कोंडाओळ ते व्हिनस कॉर्नर हा मार्गही पोलिसांनी बॅरेकेडस् लावून बंद केला. गोकुळ हॉटेल चौक ते पार्वती चौक हा रस्ताही बंद झाला. सीपीआर चौक ते खानविलकर पेट्रोल पंप हा रस्ताही बंद झाला. ॲसेंब्ली रस्ता, रेणुका मंदिर ते जवाहरनगर, रामानंदनगर ते जरगनगर, आयटी पार्क रस्ता आदी मार्ग बंद झाले. त्यामुळे शहरात येण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी केवळ उमा टॉकीज चौक, टाकाळा, उड्डाणपूल, ताराराणी चौक हा एकमेव मार्गच सुरू होता. त्यामुळे या मार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.
साडेबाराच्या सुमारास जुन्या शिरोली नाक्याजवळील सर्व्हिस रोडवर पाणी आले. कोल्हापूर सांगली फाट्यावरील मार्बल लाईन येथेही पाणी आले. तसेच नोकरी व व्यवासायानिमत्त एमआयडीत गेलेले लोक ही घरी परतण्यास सुरवात झाली. त्यामुळे शहरातील वाहतुकीच्या कोंडीत आणखी भर पडली. ताराराणी चौक ते उड्डाण पुलापर्यंतचे अंतर जाण्यासाठी तासंतास वाहन चालकांना प्रतिक्षा करावी लागत होती. यात रुग्णवाहिकाही अडकून पडल्या होत्या. त्यांना मार्ग काढून देताना पोलिसांना मेहनत घ्यावी लागली. वाहतूक कोंडीचे हे दृष्य दिवसभर पहावयास मिळाले.
पोलिसांच्या सूचना ...
उमा टॉकीज ते जनता बाजार हा रस्ता वाहतुकीसाठी खुला असल्याने येथे वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. पोलिसांचे येथे गस्तीस स्पिकरवरून अनावश्यक गर्दी करू नका, पूर पाहण्यासाठी बाहेर पडू नका, रस्त्यावर वाहने पार्किंग करू नका अशा सूचना देत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.