Kolhapur Flood : शिरढोणला पूरग्रस्तांनी अधिकाऱ्यांना घातले कोंडून; तणावाचं वातावरण निर्माण होताच...

Kolhapur Flood : स्थलांतरित लोकांची व जनावरांच्या चाऱ्यांची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलक शांत झाले.
Shirdhon Kolhapur Flood
Shirdhon Kolhapur Floodesakal
Updated on
Summary

आंदोलक सासणे यांना बोलण्यास अटकाव केल्याने संतप्त आंदोलक महिलांनी कार्यालयातील सर्वच अधिकाऱ्यांना कोंडून घालत गाव चावडीला कडी घातली. यामुळे मोठा तणाव निर्माण झाला.

जयसिंगपूर : पूरग्रस्तांना कोणत्याही सुविधा नाहीत की मदत नाही. प्रधासनाच्या ढिम्म कारभारामुळे पूरग्रस्त आणि जनावरांचे हाल होत असल्याने शिरढोण (ता. शिरोळ) येथील अन्याय निवारण कृती समितीतर्फे गाव चावडीसमोर सोमवारी (ता. ५) धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी पूरग्रस्त आणि अधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाल्याने संतापलेल्या पूरग्रस्तांनी पशुवैद्यकीय पर्यवेक्षक, तलाठी, कृषिसेवक, आरोग्य सेवक, मंडल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी यांना तलाठी कार्यालयात कोंडून घातल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. अधिकाऱ्यांच्या माफीनंतर पूरग्रस्त शांत झाले.

शिरढोण येथील पंचगंगा नदीला आलेल्या पुरामुळे स्थलांतरित झालेल्या कुटुंबांना सेवा मिळावी, जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था व्हावी, पूरबाधित पिकांचा पंचनामा केला जावा, या मागणीसाठी कृती समितीने सोमवारी सकाळी येथील गाव चावडीसमोर धरणे आंदोलन केले होते.

Shirdhon Kolhapur Flood
Koyna Dam : कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग बंद; कोयनानगर 53, नवजा 94 तर महाबळेश्वरला 59 मिलीमीटर पावसाची नोंद

पूरग्रस्त मोठ्या संख्येने या ठिकाणी जमले. आंदोलनाची तीव्रता ओळखून तहसीलदार अनिलकुमार हेळकर, कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस आंदोलनस्थळी आले. तहसीलदार हेळकर यांनी आदोलकांचे म्हणणे ऐकून तलाठी व मंडल अधिकारी यांना पूररेषा निश्चित करून पीक पंचनामा करण्याचे आदेश दिले.

स्थलांतरित लोकांची व जनावरांच्या चाऱ्यांची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलक शांत झाले. त्यानंतर तहसीलदार हेळकर व पोलिस अधिकारी फडणीस परत गेले. त्यानंतर आंदोलक व स्थानिक अधिकाऱ्यांत चर्चा सुरू असताना अधिकाऱ्याने दमदाटी करत आंदोलक सासणे यांना बोलण्यास अटकाव केल्याने संतप्त आंदोलक महिलांनी कार्यालयातील सर्वच अधिकाऱ्यांना कोंडून घालत गाव चावडीला कडी घातली. यामुळे मोठा तणाव निर्माण झाला. अधिकाऱ्यांनी माफी मागितल्यानंतर महिलांनी सर्वच अधिकाऱ्यांची सुटका केली. यावेळी बोरगावे, शोभा पाणदारे, संगीता सुतार, शांताबाई सातवेकर, लक्ष्मी हुग्गे, हिराबाई सासणे, शोभा मिणचे, गौराबाई मिणचे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.