कोल्हापूर - गव्याचा शहरात फेरफटका; वडणगेच्या दिशेने रवाना

शहराबाहेर जाण्याचा मार्ग दाखवला आणि आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास हा गवा वडणगेच्या दिशेने गेला
kolhapur
kolhapur
Updated on
Summary

शहराबाहेर जाण्याचा मार्ग दाखवला आणि आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास हा गवा वडणगेच्या दिशेने गेला

कोल्हापूर : गेल्या पाच दिवसांपासून शहरानजीकच्या गावांमध्ये ठाण मांडलेल्या गावा शोधण्यासाठी वनविभागाची मोहीम सुरू आहे. (बुधवार) काल दिवसभर कदमवाडी परिसरातील ऊस शेतीमध्ये ठाण मांडलेला गवा रात्री साडेअकराच्या सुमारास जाधवाडी बापट कॅम्पच्या दिशेने बाहेर पडून शहरातील मध्यवर्ती भागात फेरफटका मारला आहे. (Kolhapur) वनविभागाने (Forest Department) सुरक्षितरित्या गव्याला शहराबाहेर जाण्याचा मार्ग दाखवला आणि आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास हा गवा (Bison) वडणगेच्या दिशेने गेला आहे.

kolhapur
राष्ट्रवादीला होणार फायदा? निवडणुकीची सुत्रं सेनेच्या माजी आमदारांकडे

कसबा बावडा (Kasaba Bawada) येथील झूम प्रकल्पा (Zoom Project) जवळच्या ऊस शेतीमध्ये गवा असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानंतर वन विभागाची 6 पथके या गव्याच्या हालचालींवर काल दिवसभर लक्ष ठेवून होती. अवतीभवतीचा परिसर वन पथकाने पिंजून काढला. मात्र गवा दिवसभर कुठेही दिसून आला नाही. रात्री १० वाजता वनविभागाचे एक पथक येथे गस्त घालत होते. आज सकाळी गव्याची शोध मोहीम पुन्हा सुरू होणार होती. याचवेळी रात्री साडेअकरा वाजता गावात चालत जाधवाडी बापट कॅम्पच्या (Bapat camp) दिशेने बाहेर पडला. तेथून तो चालत मार्केट यार्डकडे गेला व पुन्हा परतला. तीन गल्ल्यांमधून चालत मुक्त सैनिक वसाहतमध्ये (Mukt Sainik Vasahat) परत आला. तेथून पुन्हा कदमवाडीच्या शेतीतच गेला. याची माहिती मिळताच पुन्हा अग्निशामन दल, वनविभागाचे पथक व पोलिस दाखल झाले याचवेळी गवा कदमवाडीतील शेतीतून बाहेर पडला.

यावेळी वनविभागाचे पथकाने मोटरसायकल, वनविभागाच्या गाड्या गव्याच्या मागेपुढे लावून त्याला रस्त्याकडेने चालतच सर्किट हाउस, ताराबाई पार्क ते जिल्हाधिकारी कार्यालय, तिथून सीपीआर चौक, जयंती नाल्याच्या दिशेने घालवले. हा गवा नाल्यात उतरला. त्यानंतर तो काही वेळ गायब झाला. थोड्याच वेळात पंचगंगा स्मशानभूमीकडील मार्गाने जुना बुधवार पेठकडे आला. तेथे काही लोकांनी त्याला पाहिले. वनविभागाचे पथकही या गव्याला येथे शोधत होते. गवा दिसताच पुन्हा त्याला ऊस शेतीच्या दिशेने नेले. त्यानंतर नदी ओलांडून गवा वडणगेचा हद्दीत गेला आहे. रात्रभर या गव्याने शहराच्या मध्यवर्ती भागातच फेरफटका मारला आहे. अशात अग्निशमन दल व वनविभागाच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली त्यामुळे कोणत्या गल्लीत न घुसता तू मुख्य मार्गाने जंगला दिशेने मार्गस्थ झाला आहे.

kolhapur
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं; सख्खे 4 भाऊ 'आमदार'

गवा साडेअकराच्या सुमारास शेतीतून बाहेर साडेअकरा ते दोन वाजेपर्यंत जाधववाडी, घोडकेवाडी, मुक्त सैनिक वसाहत, कदमवाडी, रुईकर कॉलनी या भागात त्याचा फेरफटका दोन ते चार वाजता सर्किटाऊस ते सीपीआर चौक जयंती नाला परिसरात वावर पहाटे ४ नंतर पहाटे ६ वाजेपर्यंत गवा वडणगेच्या दिशेने रवाना झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()