बंगारप्पा यांनी १९९० ते १९९२ दरम्यान कर्नाटकाचे सहावे मुख्यमंत्री म्हणून काम केले. विधानसभेत त्यांनी १९६७ पासून १९९६ पर्यंत सलग सोरबचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर १९९६ पासून ते २००९ पर्यंत सहा वेळा त्यांनी लोकसभा निवडणूक लढविली. त्यात त्यांचा दोन वेळा पराभव झाला; तर आपल्या कारकीर्दीत त्यांनी कर्नाटक विकास पार्टी आणि कर्नाटक काँग्रेस पक्ष अशा दोन पक्षांची स्थापना केली.
बंगारप्पा यांचा जन्म २६ आॅक्टोबर १९३३ ला शिमोगा जिल्ह्यातील सोरब तालुक्यातील कुबटूर या गावी झाला. त्यांचा विवाह शकुंतला यांच्या झाला. त्यांची पाचपैकी दोन मुले कुमार बंगारप्पा आणि मधु बंगारप्पा ही राजकारणात आहेत. दिवरु ईडीग या समाजाशी ते संबंधित होते. बंगारप्पा यांनी कला शाखेची पदवी त्यानंतर कायद्याची पदवी तर नंतर समाजशास्त्रात पदविका मिळविली होती.
त्यांची राजकीय कारकिर्द समाजवादी म्हणून सुरु झाली. सोरब या घरच्या विधानसभा मतदारसंघातून त्यांची १९६७ मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवड झाली. अखेरपर्यंत त्यांनी मागासवर्गीयांचा दमदार नेता म्हणून ओळख निर्माण केली.
त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करून देवराज अर्ज यांच्या मंत्रिमंडळात १९७७ मध्ये गृह राज्यमंत्री बनले. कॅबिनेटपदी बढती मिळताना १९७८ मध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रिपद मिळाले. १९८० आणि १९८१ मध्ये महसूल, कृषिमंत्रिपदही त्यांनी भोगले.
दरम्यान १९७९ मध्ये कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे ते अध्यक्षही बनले. १९८३ मध्ये काँग्रेस सोडून त्यांनी कर्नाटक क्रांती रंगा या पक्षाची स्थापना केली. त्यांच्या या पक्षाच्या मदतीने जनता पक्षाने कर्नाटकात पहिल्यांदाच काँग्रेसेत्तर सरकार स्थापन केले. नंतर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांना काँग्रेसमध्ये आणून मुख्यमंत्री केले. दरम्यान, क्लासिक काँप्युटर घोटाळ्यात त्यांचे नाव आल्यावर त्यांना पद सोडावे लागले.
सोरबमधून सलग सात वेळा आमदार झाल्यावर कर्नाटक काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर शिमोग्यातून १९९६ मध्ये खासदार बनले. त्यानंतर १९९८ मध्ये कर्नाटक विकास पक्षाच्या उमेदवारीवर नि़वडणूक लढविताना शिमोग्या पहिल्यांदाच ऐतिहासिक पराभव झाला; तर १९९९ मध्ये पुन्हा काँग्रेसच्या, तर २००४ मध्ये भाजपच्या उमेदवारीवर पुन्हा खासदार बनले.
२००५ मध्ये भाजपचा राजीनामा देऊन समाजवादी पक्षात गेले आणि पोटनिवडणूक जिंकली; तर भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी. एस. येडियुराप्पा यांच्याविरुद्ध शिकारीपूरची विधानसभा निवडणूक गमावली; तर २००९ मध्ये येडियुराप्पा यांचे पुत्र राघवेंद्र यांच्याविरुद्ध लोकसभेसाठी त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द समाप्त झाली.
बंगारप्पा यांचे मोठे पुत्र कुमार हे अभिनेते आहेत. नाट्यमयरीत्या त्यांनी १९९६ मध्ये राजकारणात प्रवेश केला. बंगारप्पा यांनी लोकसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांना सोरब येथून पोटनिवडणुकीसाठी रिंगणात उतरविले. आणि कर्नाटक काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर त्यांनी विधानसभेत प्रवेश केला.
१९९९ मध्ये पुन्हा एकदा सोरबमधून त्यांनी विधानसभेत प्रवेश केला. पण यावेळी ते काँग्रेसचे उमेदवार होते. २००४ मध्ये ते तिसऱ्यांदा आमदार बनले. त्यानंतर ते एस. एम. कृष्णा यांच्या मंत्रिमंडळात नगरप्रशासन खात्याचे मंत्री बनले. त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला.
पण, फक्त २० दिवसांत ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले; तर २००८ ची निवडणूक ते हरले. या वेळी समाजवादी पक्षाचे उमेदवार आणि त्यांचे बंधू मधू बंगारप्पा हेही रिंगणात होते. त्यानंतर भाजपच्या उमेदवारीवर २०१८ मध्ये विधान परिषदेवर निवडून गेले. या वेळी त्यांनी बंधू मधू बंगारप्पा यांचा १३,५०० मतांनी पराभव केला.
-कुमार बंगारप्पा
मधू बंगारप्पा कन्नड चित्रपटसृष्टीत अभिनेते आणि निर्माते म्हणून काम करतात. त्यानंतर काँग्रेसने त्यांना इतर मागासवर्गीय अध्यक्षपद दिले आणि राजकारणात आणले. बंगारप्पांचे लहान पुत्र असलेल्या मधू बंगारप्पा यांनी धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या उमेदवारीवर सोरब विधानसभेची निवडणूक जिंकली.
- मधू बंगारप्पा
२०१८ मध्ये शिमोगा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उतरले. त्यानंतर पुन्हा २०२१ मध्ये काँग्रेसमध्ये परतले. एस. बंगारप्पा यांच्या जीवनावर आधारित बेळीयप्पा बंगारप्पा (१९९२) हा चित्रपट काढला होता. तो ब्लाॅकबस्टर ठरला. त्यात कुमार बंगारप्पा अभिनेते होते; तर दोन्ही बंधू सहनिर्माते होते
काँग्रेस, भाजप, समाजवादी पक्ष, धर्मनिरपेक्ष जनता दल अशा पूर्णपणे वेगवेगळ्या विचारसरणी असलेल्या पक्षात विशेष स्थान निर्माण केलेले माजी मुख्यमंत्री एस. बंगारप्पा एक अजब रसायन होते. उण्यापुऱ्या साडेचार दशकांच्या राजकारणात झाडून सर्व पदे त्यांनी भोगली. ‘सोलईल्लद सरदार’ (अजिंक्य सरदार) अशी बिरुदावली खुद्द विरोधी पक्षांनी त्यांना दिली होती, त्यातच त्यांचे राजकीय माहात्म्य आहे.
- संजय उपाध्ये
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.