तपोवन मैदानाकडे कार्यक्रमासाठी जाताना शिंदे यांनी काही लोकांना भेटून त्यांचे म्हणने ऐकून घेतले.
उजळाईवाडी : ‘शासन आपल्या दारी’ (Shasan Aplya Dari Yojana) या कार्यक्रमासाठी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे कोल्हापूर विमानतळावर (Kolhapur Airport) जंगी स्वागत करण्यात आले.
पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar), आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. श्री. शिंदे दुपारी ३.४५ वाजता विमानतळावर येणार होते.
शेकडो लोकांनी त्यांना भेटण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, वेळेअभावी ते भेटू शकले नाहीत. मुख्यमंत्र्यांचे पावणेचार वाजता उजळाईवाडी येथील विमानतळीवर आगमन होणार होते. मात्र, त्यांना यायला तास ते दीड तास वेळ झाला. त्यांचे विमान येण्याआधी कडक पोलिस बंदोबस्त तैनात होता.
कोणालाही भेटू दिले जाणार नाही, अशा सक्त सूचना जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिल्यामुळे ज्येष्ठ नेत्यांनाही त्यांच्यापर्यंत पोहोचता आले नाही. दरम्यान, तपोवन मैदानाकडे कार्यक्रमासाठी जाताना शिंदे यांनी काही लोकांना भेटून त्यांचे म्हणने ऐकून घेतले. विमानतळावर पाच ते दहा मिनिटे थांबून ते तत्काळ तपोवन मैदानाकडे रवाना झाले. रस्त्यावर कडक पोलिस बंदोबस्त असल्याने उजळाईवाडी येथील महामार्गावरील पूल येथे काही काळ गर्दी झाली. मुख्यमंत्र्यांची वाहने गेल्यानंतर ही गर्दी कमी झाली.
माजी मंत्री भरमू अण्णा पाटील (Bharmu Anna Patil) हे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी तब्बल तासभर विमानतळाबाहेर ताटकळत उभे होते. त्यांना विमानतळाच्या कार्यालयात सोडले जावे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. पण, बंदोबस्तामुळे त्यांना सोडले नाही. दरम्यान, आमदार आबिटकर आल्यानंतर ते स्वत: येऊन पाटील यांना विमानतळाच्या कार्यालयात घेऊन गेले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.