Sanjay Ghatge : 'हसन मुश्रीफ तुम्ही आल्लाची शपथ घेऊन सांगा, की एक रुपयाही तुम्ही मला दिला आहे काय?'

या विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना कोणत्याही परिस्थितीत मदत करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
Sanjay Ghatge Hasan Mushrif
Sanjay Ghatge Hasan Mushrifesakal
Updated on
Summary

'मागील विधानसभा निवडणुकीत संभाजी भिडे गुरुजी हे देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन आले होते. तुम्ही माघारी घ्या. तुम्हाला विधानपरिषदेचे आमदार करतो.'

म्हाकवे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक आश्वासने दिली जात आहेत. पण, आम्हाला जनसामान्यांचा विकास पाहिजे आहे. या विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना कोणत्याही परिस्थितीत मदत करण्याचा निर्णय आम्ही घेतला असून, त्यांच्यासोबत राहू. या निर्णयाबद्दल कोणी कितीही काहीही बोलले तरी आमची विचारधारा आणि दिशा बदलणार नाही, असे प्रतिपादन माजी आमदार संजय घाटगे (Sanjay Ghatge) यांनी केले.

साके (ता. कागल) येथील विविध विकासकामांच्या लोकार्पण व उद्‌घाटन कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे उपस्थित होते.

Sanjay Ghatge Hasan Mushrif
'राज्यातील सामाजिक परिस्थितीची जाण असलेले नेते शरद पवाराच आरक्षणाचा प्रश्‍न सोडवतील'; OBC नेते लक्ष्मण हाकेंना विश्वास

घाटगे म्हणाले, ‘लोकसभेला मला तिकीट मिळण्याची खात्री होती. परंतु, मुश्रीफ व आमच्या कार्यकर्त्यांची ग्रामस्तरावर युती आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने मी मुश्रीफांविषयी काही चांगले बोललो. काही लोकांनी याची कात्रणे वरिष्ठांना दाखवत मी मुश्रीफांच्या जवळ असल्याचे भासवले. पण, आम्ही असे कधीच नव्हतो. माझा भाजपला विरोध आहे.

हसन मुश्रीफ तुम्ही भाजपमध्ये असता तर तुमच्याकडे ढुंकूनही पाहिले नसते. तुम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे समतावादी नेते आहात. म्हणून आम्ही तुमच्याबरोबर आहे. तुम्ही सर्वसामान्य, दलित, उपेक्षित, गोरगरिबांना उराशी बाळगणारे नेते आहात. म्हणून आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार असून, यामध्ये कोणीतीच शंका घेण्याचे कारण नाही. त्याचे काय परिणाम होतील ते होऊ देत.’

Sanjay Ghatge
Sanjay Ghatgeesakal

एक रुपायाही तुम्ही मला दिला आहे काय?

गत विधानसभा निवडणुकीत मी मुश्रीफांकडून पैसे घेऊन निवडणूक लढवल्याचे काही लोकांनी आरोप केले आहेत. हसन मुश्रीफ तुम्ही आल्लाची शपथ घेऊन सांगा की एक रुपयाही तुम्ही मला दिला आहे काय? दिला तरी तो मी घेणार नाही, असे घाटगे यांनी सांगितले.

Sanjay Ghatge Hasan Mushrif
'डॉ. आंबेडकरांनी ज्या न्यायालयात युक्तिवाद केला, तिथून मी..'; संसदेत काँग्रेस खासदाराच्या पहिल्याच भाषणाने वेधलं लक्ष

‘त्यांचा’ विश्वासघात करून कोणतेच पद नको

मागील विधानसभा निवडणुकीत संभाजी भिडे गुरुजी हे देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन आले होते. तुम्ही माघारी घ्या. तुम्हाला विधानपरिषदेचे आमदार करतो. पण, उद्धव ठाकरे यांनी मला विश्वासाने उमेदवारी दिली होती. त्यांचा विश्वासघात करून मला विधान परिषदेचे आमदार काय कोणतेच पद नको, असे घाटगे यांनी स्पष्ट केले.

रुपयाही कधी दिला नाही : मुश्रीफ

हसन मुश्रीफ म्हणाले, ‘संजय घाटगे यांनी घेतलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. त्यांनी निवडणूक लढवायला पाहिजे होती. परंतु, त्यांनी यापूर्वीच निवडणूक न लढविण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांची अडचण मी समजू शकतो. मी संजय घाटगे यांना कोणत्याही निवडणुकीत एक रुपया कधी दिला नाही, हे शपथपूर्वक सांगतो.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.