पुरेशी लस द्या; राजू शेट्टींचे थेट पंतप्रधानांना पत्र

पुरेशी लस द्या; राजू  शेट्टींचे थेट पंतप्रधानांना पत्र
Updated on

जयसिंगपूर (कोल्हापूर) : राज्यात कोरोनाच्या (coivd 19) संसर्गाने कहर केला आहे. शासन पातळीवर लसीकरणाची मोहिम लसीअभावी कुचकामी ठरत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढला असून मृतांची संख्याही वाढत असताना महाराष्ट्रात पुरेशी लस पुरवठा करुन अधिकाधिक लोकांना तातडीने लसीकरण करुन मृत्युचे प्रमाण रोखण्याची मागणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी(Raju Shetti) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोंदी (Narendra Modi)यांच्याकडे केली आहे.

Former MP Raju Shetti covid vaccine demand letter to Prime Minister Narendra Modi kolhapur marathi news

महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात कोरोनाचा धोका वाढला आहे. अशा स्थितीत केंद्राने अधिकाधिक लस पुरवठा करुन कोरोनाला आटोक्‍यात आणण्याची गरज आहे. दिवसेंदिवस वाढती रुग्ण संख्या आणि जाणाऱ्या बळींची संख्या चिंता व्यक्त करणारी आहे. लसीचा अनियमित पुरवठा होत असल्याने ज्येष्ठांसह सर्वांनाच नाहक त्रास सोसावा लागत आहे. लसीकरणासाठी केंद्रावर पहाटेपासून हजेरी लावणाऱ्यांनाही लस मिळत नसल्याची स्थिती आहे. ऑनलाईन नोंदणीचाही बोजवारा उडाला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी राज्यांकडून लॉकडाऊन घोषीत करण्यात आला असला तरी अद्यापही गर्दीच्या ठिकाणांवर नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. हि बाब कोरोनाला संसर्ग वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे.

लसीकरण केंद्रात शेकडो लोकांच्या रांगा लागत आहेत. याठिकाणी सोशल डिस्टन्सिंग राखले जात नाही. लसीकरण केंद्रे कोरोनाचे हॉटस्पॉट बनली आहेत. लसीकरणासाठी लोकांच्या रांगा लागत असताना शासन त्यांना लस देण्यात कमी पडत आहे. लसीकरण मोहिम अयशस्वी झाली असतानाच शासनाने 18 ते 44 वयोगटातील लोकांनाही लसीकरण जाहीर केल्याने गोंधळात भर पडली आहे. लस उपलब्ध नसेल तर त्या प्रमाणात नियोजन करण्याची गरज असताना नियोजनाअभावी केंद्रावर रांगा जमत आहेत. एका बाजूला गर्दी करु नका असे प्रशासन सांगत असताना प्रशासनाच्या नियोजनाअभावी गर्दी जमत आहे.

महाराष्ट्रात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि जाणारे बळी लक्षात घेता तातडीने लस पुरवठा गरजेनुसार करावा. केंद्र सरकारने राज्यातील स्थितीचा आढावा घेऊन तातडीने लसीकरण मोहिम गतीने राबवावी. यासाठी गरजेनुसार लस पुरवठा करावा अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.

Former MP Raju Shetti covid vaccine demand letter to Prime Minister Narendra Modi kolhapur marathi news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.