Former MP Raju Shetti Aakrosh Padyatra Panhala
Former MP Raju Shetti Aakrosh Padyatra Panhala esakal

Raju Shetti : मागचा हिशोब पूर्ण करत नाहीत, तोपर्यंत सोन्याची कांडी भंगार भावात देऊ नका; राजू शेट्टींचं शेतकऱ्यांना आवाहन

शेतकऱ्यांनी ऊस कारखान्यांना घालण्याची घाई करू नये.
Published on
Summary

मागचा हिशोब पूर्ण करत नाही तोपर्यंत उसाचे (Sugarcane Rate) कांडे तोडून देऊ नका यावर ठाम राहा.

सातवे : ‘यंदा साखर कारखाने (Sugar Factory) ८० ते ९० दिवस चालतील. शेतकऱ्यांनी ऊस कारखान्यांना घालण्याची घाई करू नये. उसाची कांडी ही सोन्याची कांडी आहे. ती भंगार भावात देऊ नका,’ असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केले. ते पन्हाळा तालुक्यातील सातवे येथे आयोजित आक्रोश पदयात्रेत बोलत होते.

Former MP Raju Shetti Aakrosh Padyatra Panhala
Raju Shetti : 'स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर वाहतूक अडवू नये'; 'भोगावती'चे राजू शेट्टींना साकडे

शेट्टी म्हणाले, ‘गेले २५ ते ३० वर्षे आपण ऊसदराबाबत लढा उभा केला आहे. या लढ्याला चांगले यशही मिळत आहे. मात्र, प्रत्येक वेळी हे सर्व साखर कारखानदार साखर कारखाने कर्जातच आहेत असे सांगत आहेत. त्यामुळे उसाचे दर वाढले नाहीत. साखर निर्यातबंदी, साखर उद्योग धोक्यात आहे असे भासवले जात आहे.

मागचा हिशोब पूर्ण करत नाही तोपर्यंत उसाचे (Sugarcane Rate) कांडे तोडून देऊ नका यावर ठाम राहा. जेंव्हा बाजारपेठेत मागणीपेक्षा पुरवठा घटला, तेव्हा दर वाढतात पुरवठा वाढला की दर कमी होतात. त्यामुळे सोन्याची कांडी भंगार भावात देऊ नका, असंही त्यांनी आवाहन केलं.

Former MP Raju Shetti Aakrosh Padyatra Panhala
Maratha Reservation : मराठा समाजाचे एवढे आमदार असूनही आरक्षण देत नाहीत, पण आम्ही हे मुद्दाम..; काय म्हणाले अजितदादा?

यावेळी सातवे गावच्या वतीने आकाराम खामकर व बबन पानसकर यांच्या हस्ते राजू शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे पन्हाळा अध्यक्ष प्रणव निकम, विजय सावंत, दादा आंब्रे, अरविंद शेलार, सौरभ पाटील, पिंटू गोंधळी, शशिकांत शिंदे, भास्कर खामकर, तुलसीदास इंगवले, राहुल पाटोळे, बबन घोरपडे, व सातवे परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Former MP Raju Shetti Aakrosh Padyatra Panhala
Karnataka : भाजपचं टेन्शन वाढवणारी बातमी! माजी मुख्यमंत्री करणार काँग्रेसमध्ये प्रवेश? 'या' युतीला केला विरोध

जेसीबीच्या साह्याने फुलांची उधळण

सातवे गावात राजू शेट्टींचे जोरदार स्वागत करण्यात आले. जागोजागी जेसीबीच्या साह्याने फुलांची उधळण करण्यात आले. तसेच ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. जयसिंगपूर येथे विक्रमसिंह मैदानावर ७ नोव्हेंबर रोजी ऊस परिषद होणार आहे. या ऊस परिषदेसाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.