Raju Shetti : फक्त आठ दिवस थांबा, सगळे साखर कारखानदार गुडघे टेकतील; राजू शेट्टींचा स्पष्ट इशारा

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील बहुतेक कारखाने बंद आहेत.
Raju Shetti Jaysingpur Sugarcane Council
Raju Shetti Jaysingpur Sugarcane Councilesakal
Updated on
Summary

पुढच्या आठ दिवसांत आंदोलन नेटाने सुरू ठेवावे लागेल.

सरवडे : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील बहुतेक कारखाने बंद आहेत. ४०० रुपये घेण्याचे आंदोलन आता अंतिम आहे. शेतकऱ्यांनो, ऊसतोड घेऊ नका. घेतील त्यांना इंगा दाखवा. फक्त आठ दिवस थांबा. हे सगळे साखर कारखानदार गुडघे टेकतील, असे माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी स्पष्ट केले.

आक्रोश यात्रा आणि ठिय्या आंदोलनानंतरही शासन आणि कारखानदार तोडगा काढण्यास पुढाकार घेत नसल्याने तुरंबे (ता. राधानगरी) येथील सिद्धिविनायक मंदिराच्या प्रांगणात पुढील रणनीती ठरवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे (Swabhimani Shetkari Sanghatana) आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. 

Raju Shetti Jaysingpur Sugarcane Council
Maratha Reservation : PM मोदींना भेटल्यावरच मराठा आरक्षणाचा तोडगा निघेल, अन्यथा..; काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?

शेट्टी म्हणाले, ‘कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील एफआरपी एकरकमी घेऊ शकलो. गेल्यावर्षी हंगाम संपला. मात्र, साखर विक्री झाली नाही. साखरेचे दर वाढले, विक्री झाली. मग आता तुम्ही त्याचा मोबदला द्यायला का कारकूर करता? पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना कसे पैसे देता येतात याचा हिशेब सांगितला तर त्यांनी देता येत नाही अशी भूमिका घेतली; पण आम्ही तुम्हाला सोडणार नाही. अजून एक महिना शेतकरी थांबायला तयार आहे. त्यामुळे कारखानदारानी शेतकऱ्यांच्या खांद्यावर हंगाम देऊ नये. तुटलेला ऊस नेताना जर नुकसान झाले तर कारखान्यानी द्यावे असे लिहून घ्या.’

स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. जालंदर पाटील म्हणाले, ‘अभ्यासपूर्ण निकषांवर मागण्या करूनही शासन मध्यस्थी करायला अजून तयार नाही. पुढच्या आठ दिवसांत आंदोलन नेटाने सुरू ठेवावे लागेल.’ अजित पोवार म्हणाले, ‘कष्टाने उभ्या केलेल्या पिकाला उच्चांकी भाव मिळवण्यासाठी शेतकरी संघटित व्हायला पाहिजे.’

Raju Shetti Jaysingpur Sugarcane Council
'किसीं की भी सरकार आये, बस्स मजे कर रही हैं..'; तरुणाईत सरकारविरोधात संताप, मतदान कोणाच्या पारड्यात?

संतोष बुटाले, वसंत चव्हाण, जनार्दन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. भागोजी कांबळे, सागर शंभूशेट्ये, सचिन शिंदे, एस. व्ही. पाटील, इंद्रजित भारमल, शरद मुसळे उपस्थित होते. पांडुरंग जरग यांनी स्वागत केले. सरदार पाटील यांनी सूत्रसंचालन केले. माजी सरपंच आनंदा घारे यांनी आभार मानले.

Former MP Raju Shetti
Former MP Raju Shettiesakal
Raju Shetti Jaysingpur Sugarcane Council
CM Siddaramaiah : 'तो' आरोप सिद्ध झाल्यास राजकारणातून निवृत्ती घेईन; CM सिद्धरामय्यांचं मोठं विधान, असं काय घडलं?

शेतकऱ्यांच्या बाजूचे नेमके कोण?

आक्रोश यात्रा, ठिय्या आंदोलन केले. मात्र, याला अगदी विरोधी पक्षांनीही संघटनेला पाठबळ दिले नाही. मग शेतकऱ्यांच्या बाजूचे नेमके कोण आहेत, असा उद्विग्न सवाल माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.