लग्नाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; भीषण अपघातात नवरीच्या भावासह आजीचा मृत्यू

Container-Car Accident
Container-Car Accidentesakal
Updated on
Summary

लग्नकार्यासाठी जाणाऱ्या कारमधील चार जण जागीच ठार झाले.

निपाणी : राष्ट्रीय महामार्गावरील (National Highway) तवंदी (Tavandi Ghat) येथील हॉटेल अमरनजीक कंटेनर-कार (Container-Car Accident) यांच्यात शुक्रवारी (ता. २७) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. त्यात लग्नकार्यासाठी (Wedding Ceremony) जाणाऱ्या कारमधील चार जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये नवरीच्या भावासह, चुलते-चुलती व आजीचा समावेश आहे. महेश देवगोंडा पाटील (वय २३), आदगोंडा बाबू पाटील (वय ५५), छाया आदगोंडा पाटील (वय ५५, तिघेही बोरगाववाडी, ता. निपाणी) व चंपाताई मगदूम (वय ८०, रा. राशिवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. मंगल कार्यासाठी जाणाऱ्या चौघांचा जागीच मृत्यू झाल्याने शहर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

याबद्दल घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, बोरगाववाडी (Borgaonwadi) येथील देवगोंडा पाटील यांच्या मुलीचा विवाह शुक्रवारी (ता. २७) तवंदी येथील समुदाय भवनात होता. त्यासाठी आदगोंडा व अन्य तिघेजण कार (केए २३ एन ४४२८) मधून निपाणीहून तंवदीकडे भवनाच्या दिशेने जात होते. हाॅटेल अमरसमोर गेल्यावर काही वेळात भवनाच्या दिशेने वळण घेणार इतक्यातच घाटातून निपाणीच्या दिशेने भरधाव वेगात येणारया कंटेनर (एचएल ०१ के ११२४) वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनरची कारला जोरदार धडक बसली. त्यात कारमधील आदगोंडा यांच्यासह चंपाताई, छाया आणि महेश यांचा जागीच मृत्यू झाला.

कंटेनरची धडक इतकी जोरात होती, की कार सुमारे दहा फूट उंचावर उडून सेवारस्त्यासह महामार्गाच्या बाजूला दूरवर जाऊन आदळली. त्यात कारचा चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळताच नजिकच्या भवनामधील पाहुणे, मित्रमंडळींसह अमर हाॅटेलमधील कर्मचारी, महामार्गावरुन जाणारया-येणारयांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी लोकांनी रुग्णवाहिकेसह पोलिस व हायवे पेट्रोलिंकच्या पथकाला पाचारण केले. यावेळी कारमधील मृतदेह काढण्यासाठी उपस्थितांनी निकराने प्रय़त्न केले. कारचा चक्काचूर झाल्याने मृतदेह बाहेर काढताना अडथळे येत होते. तरीही घटनास्थळी उपस्थितांनी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू ठेवले. हायवे पेट्रोलिंकसह पोलिस कर्मचारी आल्यावर त्यांनीही मदतकार्य केले. जवळपास तासाभराने सर्व मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

Container-Car Accident
राजं तुमच्यासाठी कायपण! राज्यसभेसाठी छत्रपती संभाजीराजेंना MIM आमदाराचा पाठिंबा

अपघातानंतर कंटेनर चालक व्दारकासिंग (रा. बिहार) हा फरार झाल्याची चर्चा होती. मात्र काही वेळाने व्दारकासिंग महात्मा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. त्याच्याही डोकीला दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मंडल पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी, शहर पोलिस उपनिरीक्षक कृष्णवेणी गर्लहोसूर, अनिलकुमार कुंभार यांच्यासह पोलिसांनी (Nipani Police) पंचनामा केला. निपाणीतील महात्मा गांधी रूग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. निपाणीसह परिसरात दिवसभर या अपघाताचीच चर्चा दिवसभर सुरू होती.

Container-Car Accident
आर्यन खानला क्लीन चिट; प्रियंका चतुर्वेदींनी साधला भाजपवर निशाणा, म्हणाल्या..

तीन वर्षापूर्वीच्या घटनेची आठवण

आज (ता. २७) कार व कंटेनरचा अपघात ज्या पध्दतीने आणि ज्या ठिकाणी झाला. त्याच ठिकाणी तीन वर्षापूर्वी कार व कंटेनरचा भीषण अपघात झाला. त्यात मुरगूड येथील एकाच कुटुंबातील सात जण जागीच ठार झाले होते. तशाच पध्दतीने आजची घडना घडल्याची चर्चा घटनास्थळी होती.

धोकादायक वळण

तवंदी घाटात प्रमुख चार वळणे असून ती धोकादायक ठरत आहेत. चारही वळणाच्या ठिकाणी वारंवार अपघाताच्या घटना घडतात. प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्ग असल्याने येथून ट्रक, कंटेनरसह अवजड वाहनांची भरधाव वेगात वर्दळ असते. चार वळणे झाल्यावर अमर हाॅटेलजवळ उतरती आहे. येथे घाटातून भरधाव येणारी वाहनांवर चालकांचे नियंत्रण रहात नाही. परिणामी असे प्रसंग उदभवत आहेत.

Container-Car Accident
पिंगळीत भर दुपारी घुसले सात चोर, कुणकुण लागताच काठ्या घेऊन गावकरी पोचले वेशीवर

सोशल मीडियावर चर्चा

अपघाताच्या घटनेनंतर बघता-बघता व्हाॅटस अॅप, फेसबुकसह वेगवेगळ्या सोशल माध्यमावर अपघाताचे फोटो व्हायरल झाले. सोशल मीडियावर तीन वर्षापूर्वी आणि आज घडलेल्या अपघातातील साम्य यावर अनेकांनी पोस्ट केली. धोकादायक वळण, वेगावर नियंत्रण याबद्दलही चर्चा झाली.

एकुलता मुलगा हिरावला

देवगोंडा पाटील यांना महेश एकुलता मुलगा होता. तो पुण्यात इंजिनिअर म्हणून सेवेत होता. बहिणीच्या लग्नानिमित्त तो घरी आला होता. मात्र काळाने त्यांच्यावर घाला घातला. एकुलता मुलगा हिरावल्याने बोरगाववाडीसह शहर परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. चुलता-चुलतीही या अपघातात गेल्याचे समजताच घटनास्थळी हळहळ व्यक्त करण्यात येत होती. राशिवडेहून लग्नकार्यासाठी आलेली आजीही मृत पावल्याने या कुटुंबावरही दुःखाचा डोंगर कोसळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.