बाबूराव चव्हाण यांच्या कधी ध्यानीमनी आले नसेल, अशा अपघाताच्या घटनेने त्यांच्यासह अख्या कुटुंबावरच काळाने क्रूर घाला घातल्याने अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या गेल्या.
हुपरी : गावघर सोडून ते इथे बहिणीकडे आले. इथेच ते लहानाचे मोठे झाले. चांदी व्यवसायातील (Silver Business) ज्ञान आत्मसात करून त्यांनी आयुष्यात (life) मोठे होण्याचे स्वप्न बघितले. सोबत जीवनाच्या खडतर प्रवासात आलेल्या बऱ्यावाईट प्रसंगाना साक्षी ठेवत मुलांवर उत्तम संस्कार करत मुलांचेही भविष्य उज्ज्वल घडविण्याचा त्यांनी संकल्प केला. पण, नियतीला ते मान्यच नव्हते की काय? शत्रूच्याही वाट्याला न यावा असा दुर्दैवी प्रसंग येथील चांदी व्यावसायिक बाबूराव नारायण चव्हाण (Baburao Chavan) यांच्या वाट्याला आला.