'तुम्ही शेर तर आम्ही सव्वाशेर'; नागरिकांच्या सतर्कतेमुळे नुकसान टळले

the fraud medicine of coronavirus sale in uchgaon but the people stop this fraud in kolhapur
the fraud medicine of coronavirus sale in uchgaon but the people stop this fraud in kolhapur
Updated on

कोल्हापूर (शिरोली पुलाची) : कोरोनाने जगभर धुमाकूळ घातला आहे. त्यावर अजुन कोणतेच औषध मिळालेले नाही. त्यामुळे नागरिकांच्या मनात भिती आहे, याचा फायदा घेत उचगाव परिसरातील एका हेल्थ केअर सेंटरने आयुर्वेदीक औषधाचे अमिष दाखवत नागरिकांची पैसे उकळत होते. मात्र दक्ष नागरिकांनी हा प्रकार उधळून लावत, नागरिकांना पैसे परत देण्यास भाग पाडले.

कोणत्याही आजारातून लवकर बरे होण्याचे औषध मिळाले तर ते प्रत्येकालाच हवे असते. आता तर ते औषध कोरोनासाठी असेल तर नागरिकांची गर्दी होणारच ! याच मानसिकतेचा फायदा घेत उचगाव परिसरातील एका हेल्थ केअर सेंटरने कोरोनासाठी आयुर्वेदीक व होमॅओपॅथीक औषध देण्याचे आमिष दाखवत, घरोघरी जाऊन नागरिकांना नाव नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. नावनोंदणीसाठी दहा ते पंचवीस रुपये तर त्यांची तपासणी करून पाचशे ते दोन हजार रुपयांची औषध नागरिकांच्या माथी मारली जात होती. हा प्रकार माळवाडी भागात सुरु होता. ही फसवणूक असून, केवळ पैसे लुटण्याचा प्रकार असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सतिश पाटील यांच्याकडे याबाबतची तक्रार दिली. 

यानंतर सतिश पाटील, जोतीराम पोर्लेकर, राजेश पाटील, संदिप कांबळे, विनायक पाटील, अवधुत पाटील यांनी हेल्थ केअर सेंटरकडून आलेल्या तरुणांची चौकशी केली आणि त्यांना नागरिकांचे पैसे परत देण्यास भाग पाडले. यानंतर काहींनी त्या तरुणांना पोलीसांच्या ताब्यात दिले, मात्र याबाबत कोणतीही तक्रार नोंद नसल्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांनी सांगितले.

या हेल्थ केअर सेंटरकडून ग्रामपंचायतीचा परवाना असल्याचे सांगण्यात आले. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने असा कोणताच परवाना दिला नसल्याचे सांगितले. तसेच ग्रामपंचायतीने गावात स्पीकरच्या सहाय्याने कोणालाही औषध वितरणाचा परवाना दिला नसून, नागरिकांनी कोणत्याही औषधाच्या आमिषाला बळी पडू नये असे आवाहन कले.

"प्रत्येकाचे जीवन हे मौल्यवान आहे. त्यामुळे कुठल्याही आजारावर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उपचार करावा. जेणेकरून फसवणूक होणार नाही. इतकेच नव्हे तर उपचारही योग्यरित्या होतात. आयुर्वेदीक औषधांची दुकाने थाटणाऱ्यांची पोलिसांनी परवाने तपासण्याची गरज आहे. बनावटी व्यक्तीवर कारवाईची गरज आहे."

- डॉ. योगेश खवरे, अध्यक्ष, शिरोली डॉक्टर्स असोसिएशन.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.