Kolhapur News : हसन मुश्रीफांकडून शेतकऱ्यांची फसवणूक; ‘ईडी’च्या विशेष न्यायालयाची टिपणी

राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संताजी घोरपडे साखर कारखान्यासाठी लोकांकडून पैसे संकलित केले
Fraud of farmers by Hasan Mushrif  Special Court of ED kolhapur
Fraud of farmers by Hasan Mushrif Special Court of ED kolhapurSakal
Updated on

कोल्‍हापूर : राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संताजी घोरपडे साखर कारखान्यासाठी लोकांकडून पैसे संकलित केले. मात्र हे पैसे ‘शेल’ कंपन्यांत गुंतवून शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याची टिपणी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) विशेष न्यायालयाने (पीएमएलए) केली आहे.

न्यायालयाच्या या टिपणीमुळे मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या प्रकरणात अटकेत असलेला सनदी लेखापाल महेश गुरव याचा जामीनही विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची उभारणी करण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे जमा करण्यात आले.

मात्र हे पैसे खासगी कंपन्यांमध्ये गुंतवण्यात आले. या ‘शेल’ कंपन्यांच्या संचालक मंडळात मंत्री मुश्रीफ यांची मुले कार्यरत आहेत. अशाप्रकारे मंत्री मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी स्‍पष्‍ट होत असल्याचे निरीक्षण ‘ईडी’ने नोंदवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.