Ichalkaranji Crime : मित्राचा पाठलाग करून धारदार शस्त्राने डोक्यात सपासप 22 वार; खोतवाडी-तारदाळ मार्गावर थरार

अनैतिक संबंधातून एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराने दोघा मित्रांच्या मदतीने मित्राचा खून केला.
Ichalkaranji Murder Case
Ichalkaranji Murder Case esakal
Updated on
Summary

खुनातील मुख्य सूत्रधार विनायक चौगुले आहे. त्याने क्रूरपणे हल्ला केला. डोक्यात सपासप सुमारे २२ वार केलेत.

इचलकरंजी : अनैतिक संबंधातून एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराने दोघा मित्रांच्या मदतीने मित्राचा खून केला. पाठलाग करून धारदार शस्त्राने डोक्यात सपासप २२ वार झाल्याने मयूर दीपक कांबळे (वय २६, रा. तारदाळ) जागीच ठार झाला. हा प्रकार खोतवाडी-तारदाळ मार्गावरील महादेव मंदिर (Mahadev Temple) परिसरात रात्री साडेदहाला घडला.

झटापटीत संशयित हल्लेखोर विनायक चौगुले जखमी झाला असून, त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री उशिरा संशयित म्हणून अंकुश व रेहान या दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती शहापूर पोलिसांनी दिली. जखमी मयूरला आयजीएम रुग्णालयात दाखल केले; मात्र तेथे त्याला मृत घोषित केले.

Ichalkaranji Murder Case
Loksabha Election : महाविकास आघाडी 48 जागा लढविणार, 'या' जागा ठरणार निर्णायक; काय म्हणाले आमदार जगताप?

त्यानंतर त्याच्या नातेवाईक, मित्रांनी रुग्णालयात गर्दी केली होती. रुग्णालयात शिवाजीनगर पोलिस (Shivajinagar Police) ठाण्याचा बंदोबस्त तैनात होता. पोलिस उपाधीक्षक समीरसिंह साळवे यांनी घटनास्थळी व रुग्णालयात भेट दिली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : मयूर कांबळे व हल्लेखोर चौगुले दोघे जिवलग मित्र होते. यापूर्वी दोघांमध्ये सतत वाद व्हायचा; मात्र दोघांची समजूत काढून वादावर पडदा पडत होता.

काल सायंकाळी दोघे काही मित्रांसमवेत सांगली नाका परिसरातील एका बारवर दारू पिण्यासाठी बसले होते. त्यावेळी मयूर व विनायकमध्ये वाद झाला. वादानंतर सर्वजण बाहेर पडले आणि घराच्या दिशेने दुचाकीवरून निघाले. तारदाळ खोतवाडी मार्गावर मयूरवर वार झाला. दुचाकीवरून कोसळलेला मयूर जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावू लागला; मात्र सोबतच्या तिघा मित्रांनी त्याला पुढे रस्त्यातच गाठले. चौगुलेने दोघांच्या मदतीने मयूरच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केले. रक्तबंबाळ मयूर रस्त्यावर पडला. याची माहिती मिळताच मयूरच्या मित्राने चारचाकी वाहनातून त्याला आयजीएम रुग्णालयात नेले.

Ichalkaranji Murder Case
Maratha Reservation : मराठा समाजाचे 98 टक्के सर्वेक्षण पूर्ण; 468 कुटुंबांनी दिला सर्वेक्षणास नकार

हल्लेखोराची बोटे तुटली

खुनातील मुख्य सूत्रधार विनायक चौगुले आहे. त्याने क्रूरपणे हल्ला केला. डोक्यात सपासप सुमारे २२ वार केलेत. या हल्ल्यात त्याचीच बोटे तुटली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.