Kolhapur : CPRला पूर्णवेळ अधिष्ठाता मिळाला पाहिजे; जिल्हाधिकारी

इचलकरंजी, गडहिंग्लज येथील जिल्हा उपरुग्णालयेदेखील कार्यक्षम झाली पाहिजेत
rahul rekhawar
rahul rekhawarsakal media
Updated on

कोल्हापूर : जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून सीपीआरमधील समस्यांचा आढावा घेतला. उपाययोजनांबाबत चर्चा केली. सामाजिक संस्थांना बरोबर घेऊन सीपीआरमध्ये अधिकांधिक सुविधा देणे, प्राथमिक आरोग्य केंद्र सक्षम करणे आणि इचलकरंजी, गडहिंग्लज येथील जिल्हा उपरुग्णालये कार्यक्षम करणे याबाबत चर्चा झाली.

rahul rekhawar
SIT कडे दादलानीच्या मर्सिडीजचं फुटेज, ५० लाखाची डील लोअर परेलमध्ये?

सुरुवातीला जिल्हाधिकारी रेखावार यांनी सीपीआरमधील प्रश्नांचा आढावा घेतला. कोल्हापूरबरोबरच निपाणी, सांगली, रत्नागिरी, सिंधुदूर्ग येथून रुग्ण सीपीआरमध्ये दाखल होतात. त्यामुळे व्यवस्थेवर ताण पडतो; मात्र रुग्ण सेवा हाच उद्देश असल्याने कोणालाही उपचारावाचून वंचित ठेवता येत नाही. ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. यातील बहुतांशी रुग्ण सर्पदंश, अपघात, श्वानदंश याचे असतात. प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्याही अधिक आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत; पण तेथे सर्व सेवा उपलब्ध नसतात. त्यामुळे रुग्ण सीपीआरकडे येतात. यासाठी आरोग्य केंद्र सक्षम केले पाहिजे.

rahul rekhawar
पोटनिवडणुकीतल्या पराभवामुळे कमी केले इंधनाचे दर; संजय राऊतांचे केंद्राला चिमटे

इचलकरंजी, गडहिंग्लज येथील जिल्हा उपरुग्णालयेदेखील कार्यक्षम झाली पाहिजेत. इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात अद्ययावत मशिन्स आहेत; पण ती उपयोगात आणली जात नाहीत. सीपीआरमधील स्वच्छतेचा प्रश्नही गंभीर आहे. आलेल्या रुग्णाला एकाच जागी सर्व माहिती मिळत नाही. यासाठी माहिती कक्ष सुरू करण्याची आवश्यकता आहे. सीपीआरमध्ये मेंदू विकारांवर उपचार विभाग आहे त्याची कार्यक्षमताही वाढवणे आवश्यक आहे. अस्थिरोग विभागातही जादा डॉक्टर असण्याची गरज आहे. पूर्णवेळ अधिष्ठाता मिळाला पाहिजे. उपद्रव देणाऱ्या संघटनां आदी बाबींवर जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली.

रुग्णवाहिकेची आवश्यकता

सीपीआरकडे स्वतःची रुग्णवाहिका नाही. त्यामुळे रुग्णांना थांबावे लागते. यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली पाहिजे. जिल्ह्याचा विस्तार पाहून रुग्णवाहिका वाढवण्याची आवश्यकता आहे.

पालिका रुग्णालये अद्ययावत

महापालिकेच्या अंतर्गत येणारे वॉर्ड दवाखाने, पंचगंगा आणि सावित्रीबाई फुले रुग्णालयाची क्षमता वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सीपीआरवरचा शहरातील रुग्णांचा भार कमी होईल. अशीही सूचना केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()