G20 Summit : राष्ट्रप्रमुखांच्या स्वागताचा मान कोल्हापूरच्या सुपुत्राला, बायडेन यांनी ठोकला सॅल्यूट

जी-२० परिषदेचे निमित्त कोल्हापूरचे एअर कमोडोर अभय परांडेकरांना संधी
abhay paranekar
abhay paranekar sakal
Updated on

कोल्हापूर - नवी दिल्लीत आयोजित ‘जी-२०’ परिषदेसाठी जगभरातून आलेल्या विविध देशांच्या राष्ट्राध्यक्षांचे स्वागत करण्याचा मान कोल्हापूरचे सुपुत्र आणि भारतीय वायुदलातील एअर कमोडोर अभय परांडेकर यांना मिळाला. श्री. परांडेकर यांच्या या कामगिरीने कोल्हापूरच्या वैभवशाली परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.

‘अतिथी देवो भव’ अशी कोल्हापूरची ओळख आहे. याच मातीत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेऊन वायुदलात काम करणाऱ्या श्री. परांडेकर यांना राष्ट्राध्यक्षांच्या स्वागताच्या मिळालेल्या संधीमुळे कोल्हापूरच्या आदरातिथ्याची ओळख आता जगभरातील राष्ट्राध्यक्षांना झाली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या ‘जी-२०’ परिषदेसाठी जगभरातील राष्ट्राध्यक्षांचे आगमन दिल्लीत झाले. दिल्लीच्या पालम विमानतळावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यक्तींच्या विमान उड्डाणाची जबाबदारी पार पाडण्यासाठी श्री. परांडेकर गेल्या वर्षभरापासून कार्यरत आहेत. त्यांच्याकडेच विविध राष्ट्राध्यक्षांच्या स्वागताची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

abhay paranekar
Kolhapuer News : गडहिंग्लजमधील जखमी हमालाचा मृत्यू

विमानतळावर राष्ट्राध्यक्षांचे आगमन झाल्यानंतर भारताच्यावतीने पहिले स्वागत श्री. परांडेकर यांनी केले. त्यानंतर त्या देशाचे राजदूत, भारतीय परराष्ट्र खात्यातील वरिष्ठ अधिकारी व परराष्ट्र व्यवहार मंत्री अशा क्रमाने हे स्वागत करण्यात आले. त्यात अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन, ब्रिटनचे राष्ट्राध्यक्ष ऋषी सुनक अशा दिग्गजांचा समावेश होता. शनिवारी (ता. ९) सकाळी आठ वाजल्यापासून श्री. परांडेकर हे याच कामात व्यस्त होते.

abhay paranekar
Kolhapur News : इचलकरंजीत पत्नीवर कोयत्याने हल्ला,चारित्र्याच्या संशयावरून भररस्त्यात कृत्य

श्री. परांडेकर यांनी अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष ॲल्बर्टो एंजल फर्नांडीस, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युल मॅक्रॉन, सौदे अरेबियाचे मोहम्मद बिन सलमान, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, ब्राझीलचे अध्यक्ष लुई इनाशिओ लुला डिसिल्वा यांच्यासह २० राष्ट्राध्यक्षांसह त्यांच्यासोबत असलेल्या परदेशी शिष्टमंडळाचे स्वागत केले. कालच्या (ता. ९) स्वागतानंतर आज परिषद संपवून परत जाणाऱ्या राष्ट्राध्यक्षांना निरोप देण्याचीही जबाबदारी श्री. परांडेकर यांच्यावरच होती.

abhay paranekar
Solapur : वाहतूक पोलिस दलातील प्रत्येक अंमलदाराला दररोज २० वाहनांवर कारवाई करण्याचे उद्दिष्ट

‘गेली अनेक वर्षे वायुदलात काम करताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. पण अशा प्रकारे विविध राष्ट्राध्यक्षांचे स्वागत करण्याची संधी कधी मिळेल असे वाटले नव्हते. या कामगिरीमुळे कोल्हापूरकर म्हणून अभिमानाने मान तर उंचावलीच आहे, पण या कामगिरीने आतापर्यंतच्या नोकरीचे सार्थक झाले.

अभय परांडेकर, एअर कमोडोर

कोण आहेत परांडेकर

अभय परांडेकर हे कोल्हापुरातील शुक्रवार पेठेतील रहिवासी आहेत. विद्यापीठ हायस्कूलच्या १९८८ च्या दहावीच्या बॅचचे ते विद्यार्थी आहेत. १९९५ साली ते वायुदलात हेलिकॉप्टर पायलट म्हणून दाखल झाले. मध्यंतरी त्यांच्यावर युध्दात आकाशात झेपावणाऱ्या विमानांना हवेतल्या हवेत इंधन पुरवठा करण्याची अवघड अशी कामगिरी सोपवण्यात आली होती. गेल्या वर्षभरापासून ते पालम विमानतळावर व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या उड्डाणाची जबाबदारी सांभाळत आहेत.

बायडेन यांनी ठोकला सॅल्यूट

संपूर्ण जगात दबदबा असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचे श्री. परांडेकर यांनी सॅल्यूट मारून स्वागत केले व नंतर हस्तांदोलन केले. त्यानंतर बायडेन यांनीही श्री. परांडेकर यांना सॅल्यूट मारून त्यांना प्रतिसाद दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.