Gadhinglaj : अंधाराचा फायदा घेत लाथाबुक्क्यांनी मारहाण; डोळ्यात चटणी टाकून पळवले लाखो रुपये

तोंडाला रुमाल बांधलेल्या अनोळखी व्यक्तीने ढेंगेंच्या डोळ्यात चटणी टाकली.
Gadhinglaj Halkarni Crime News
Gadhinglaj Halkarni Crime Newsesakal
Updated on
Summary

प्रतिकार करत असताना ढेंगे यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण केली. तेंव्हा ढेंगे यांनी आरडाओरड केली.

गडहिंग्लज : डोळ्यात चटणी टाकण्यासह दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन १ लाख १५ हजार रुपये लुटल्याची घटना हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे मंगळवारी (ता. २३) रात्री घडली. मारहाणीत अजित ढेंगे (रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर, सध्या रा. हलकर्णी) हे जखमी झाले आहेत. घटनेतील अज्ञात हल्लेखोर पसार झाला आहे.

पोलिसांनी सांगितले की, ढेंगे हे दोन वर्षांपासून हलकर्णीच्या खडी क्रशर कंपनीत अकाऊंट मॅनेजर म्हणून नोकरीस आहेत. यामुळे ते कोल्हापूरहून हलकर्णीतच स्थायिक झाले आहेत. मंगळवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे नऊ वाजता मोपेडने (केए ३०, ए ३०७०) कामावर पोहचले. दिवसभर क्रशरवर जमलेले १ लाख १५ हजार रुपये काळ्या रंगाच्या बॅगेत भरुन ते घराकडे घेवून येत होते.

Gadhinglaj Halkarni Crime News
Samriddhi Highway : दुभाजकाला कार धडकून चार भावांचा दुर्दैवी अंत; अंत्यविधीला गेलेल्यांवर काळाचा घाला

रात्री पावणे नऊच्या सुमारास एमएसईबी रोडवरुन राजू पाटील यांच्या शेताजवळच्या चढावर आले असता तोंडाला रुमाल बांधलेल्या अनोळखी व्यक्तीने ढेंगेंच्या डोळ्यात चटणी टाकली. खिशातून पैशाचे पाकीट काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रतिकार करत असताना ढेंगे यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण केली. तेंव्हा ढेंगे यांनी आरडाओरड केली. परंतु अंधार असल्याने कोणीच मदतीला आले नाही. त्यानंतर हल्लेखोर १ लाख १५ हजार रुपये असलेली काळ्या रंगाची बॅग घेवून पसार झाला.

Gadhinglaj Halkarni Crime News
Parbhani : लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचं 'मविआ'समोर थेट आव्हान; वादाची 'ती' ठिणगी वणवा पेटवणार?

दरम्यान, ही घटना एका ओळखीच्या डंपर चालकाच्या लक्षात येताच त्याने डंपर मालकाला मोबाईलवरून घटनेची माहिती दिली. त्यानंतर क्रशरवरील सुनील तुपूरवाडी व चंदू रवेदार हे मोटारीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी ढेंगे यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून ढेंगे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञाताविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक राजीव नवले, पोलिस निरीक्षक गजानन सरगर यांनी भेट देऊन पाहणी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()