निवडणुकीमुळे गडहिंग्लजला अर्धा कोटींची वसुली

Gadhinglaj Recovered Rs Half A Crore In Taxes Due To The Election Kolhapur Marathi News
Gadhinglaj Recovered Rs Half A Crore In Taxes Due To The Election Kolhapur Marathi News
Updated on

गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्‍यातील तब्बल 50 ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीची प्रक्रिया कर वसुलीसाठी ठरली आहे. डिसेंबर महिन्यात तालुक्‍यातील ग्रामपंचायतींची 51 लाख 66 हजार रुपयांची वसुली झाली आहे. यातील बहुतांश वसुली निवडणूक लागलेल्या गावातील आहे.

विशेष म्हणजे त्यासाठी फारसा त्रासही सहन करावा लागलेला नाही. अर्ज दाखल करताना थकबाकीदार नसल्याचा दाखला जोडणे आवश्‍यक असल्याने ग्रामपंचायत कराची आयती वसुली झाली आहे. यातील अनेक जण वर्षांनुवर्षाचे थकबाकीदार असल्याचे समजते. 

ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांना विविध प्रकारच्या मूलभूत सुविधा पुरविल्या जातात. त्यापोटी ग्रामस्थांकडून कर आकारला जातो. यामध्ये प्रामुख्याने पाणीपट्टी आणि घरपट्टीचा समावेश आहे. ग्रामपंचायतींना करातूनच उत्पन्न मिळते. पण, ग्रामपंचायत कराची वसुली करणे म्हणजे मोठ्या जिकरीचे काम समजले जाते. प्रशासनाच्या प्रयत्नांना फारसा प्रतिसाद मिळत नाही.

राजकीय अडचण नको म्हणून पदाधिकारीही यामध्ये फारसे लक्ष घालत नाहीत. परिणामी, थकबाकीचे प्रमाण अधिक राहते. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना त्यासोबत कराची थकबाकी नसल्याचा दाखला जोडणे आवश्‍यक असते. त्याचा फायदा कर वसुलीसाठी झाला आहे.

ग्रामपंचायतीसाठी असणाऱ्या इच्छुकांकडून स्वत:हून कराचा भरणा झाला आहे. कर वसुलीसाठी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना ज्यांच्या घराचे खेटे घालावे लागत होते, त्याच व्यक्ती ग्रामपंचायतीत कराचा भरणा करण्यासाठी आल्या. परिणामी, विनासायास करवसुली झाल्याचे दिसून येत आहे. यातील निम्मी रक्कम थकबाकीतील आहे. 

ग्रामपंचायत कर वसुली... 
- घर पट्टी...........31 लाख 20 हजार 
- पाणी पट्टी........20 लाख 46 हजार 

गटप्रमुखांच्या खिशाला चाट... 
ग्रामपंचायत निवडणुकीत सारेच उमेदवार आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात. पण, गावचे राजकारण सांभाळण्यासाठी पक्ष-गटप्रमुख त्यांचा आर्थिक भार सहन करतात. यातील अनेकांचा ग्रामपंचायत कर थकीत होता. उमेदवारीची गरज असल्याने त्यांचा कर भरणे अपरिहार्य होते. परिणामी, अनेक गटप्रमुखांच्या खिशाला चाट बसली आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.