नोकरीच्या (Job) मागे न लागता त्याने वडिलोपार्जित शेती चांगल्या प्रकारे करून अधिकाधिक उत्पन्न कसे मिळवता येते, याचा धडा युवकांना घालून दिला आहे.
गांधीनगर : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील पदवीधर तरुणाने नोकरीच्या मागे न लागता आपल्या २० गुंठे जमिनीत केळी बाग (Banana Garden) करून दहा महिन्यांत पावणेतीन लाखांचे उत्पन्न मिळविले. हर्षद गडकरी असे त्याचे नाव आहे. त्याने शेतीत लक्ष घालून नोकरीपेक्षा आपण चांगले उत्पन्न मिळवू शकतो, याचा आदर्श युवावर्गाला घालून दिला आहे.